Deepika Chavan On Manipur: सटाण्यातील आदिवासी बांधवांवरील खोटे गुन्हे मागे घ्या

Cases On Trible community in Satana: राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.
Deepika Chavan
Deepika ChavanSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik Political Marathi News: मणिपूरमधील अत्याचाराच्या निषेधार्थ शहरात काढलेल्या मोर्चाचे निवेदन घेण्यासाठी जाणीवपूर्वक उपस्थित नसलेल्या भाजपचे आमदार दिलीप बोरसे यांच्यामुळे संतप्त झालेल्या काही मोर्चेकऱ्यांनी दगडफेक केली होती.

मणिपूर (Manipur) प्रश्नावरून सटाणा (Nashik) विधानसभा मतदारसंघात भाजप (BJP) विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) राजकारण पेटले आहे. त्याचे पडसाद मोर्चावर गुन्हा दाखल करण्यात झाले.

Deepika Chavan
Sambhaji Bhide Controversy: सरकारला संभाजी भिडेंचा एवढा पुळका का?

याबाबत राज्य महिला आयोगाच्या सदस्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या चव्हाण राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. यानिमित्ताने भाजपचे आमदार दिलीप बोरसे आणि राष्ट्रवादीच्या माजी आमदार चव्हाण यांच्यातील राजकीय वादाला नव्याने फोडणी मिळाली आहे.

याबाबत चव्हाण म्हणाल्या, सटाणा येथील घटनेबाबत दोषींवर कारवाई नक्कीच झाली पाहिजे. मात्र या प्रकरणात विनाकारण गरीब, मोलमजुरी करणाऱ्या निष्पाप आदिवासी युवकांना अडकवले गेले आहे. पोलिसांनी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहे. त्यामुळे या निष्पाप युवकांचे जीवन उद्‌ध्वस्त केले जात आहे.

Deepika Chavan
Ulhasnagar Crime News: ननावरे दाम्पत्याच्या घराचे कुलूप तोडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न: दोघेजण सीसीटिव्हीत कैद

मणिपूरमध्ये आदिवासी महिलांची विवस्त्र धिंड काढून आदिवासी जनतेवरही सातत्याने अत्याचार होत असल्याच्या निषेधार्थ सटाणा येथे वंचित बहुजन आघाडी व बागलाण तालुक्‍यातील विविध आदिवासी संघटनांनी शहरात आक्रोश मोर्चा काढला होता. आठ ते दहा हजार आदिवासी समुदाय त्यात सहभागी झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.