Nashik News: रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात श्रमिक सेनाही मैदानात

शहरातील खड्ड्यांच्या नाशिक महापालिका भवनासमोर आंदोलन करताना श्रमिक सेनेचे पदाधिकारी.
Shramik sena agitation
Shramik sena agitationSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : शहरातील (Nashik) रस्त्यांची झालेली चाळण झाली असून, यामुळे अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने चांगल्या रस्त्यांसाठी श्रमिक सेनेतर्फे (Shramik sena) राजीव गांधी भवन येथे धरणे आंदोलन करीत मनपा (NMC) आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पंधरा दिवसात रस्त्यांची डागडुजी न झाल्यास चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. (Agitation against pits on roads)

Shramik sena agitation
Chhagan Bhujbal: कर्नाटकने महाराष्ट्राच्या संयमाचा अंत पाहू नये

मंगळवारी शिवसेना उपनेते सुनील बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली हे धरणे आंदोलन मनपा मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन येथे करण्यात आले . या वेळी शहरातील रिक्षा, टॅक्सी, टेम्पोचालक- मालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी मनपाच्या गलथान कारभाराविरोधात घोषणा देण्यात आल्या.

Shramik sena agitation
Dada Bhuse; पालकमंत्री दादा भुसेंवर गुन्हा दाखल करा!

विविध मागणीचे फलक आणि त्यावर शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे छायाचित्र लावून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या वेळी अतिरिक्त आयुक्त अशोक अत्राम यांना श्रमिक सेनेचे महानगर प्रमुख मामा राजवाडे, जिल्हाध्यक्ष अजय बागूल, कार्याध्यक्ष भगवंत पाठक, दिनेश जाधव, संदीप जाधव, राजेंद्र वाघेले, शंकर बागूल, नवाज सय्यद यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. येत्या पंधरा दिवसात रस्त्यांची डागडुजी होऊन नाशिककरांना चांगले रस्ते तयार करून दिल्यास शहरात चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला .

सध्या नाशिकमधील सर्वच रस्ते खड्ड्यात गेले आहे. त्यामुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना वाहने नादुरुस्त होत असल्याने अतिरिक्त खर्चाचा बोजा उचलावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात कर भरून त्यांना मुरूम, माती आणि खड्ड्यांचे रस्ते मिळत असेल तर याविरोधात आवाज उठविणे गरजेचे आहे. पंधरा दिवसात रस्ते दुरुस्त झाले नाहीतर चक्काजाम आंदोलन करणार आहे .

- मामा राजवाडे, महानगरप्रमुख श्रमिक सेना

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com