Chhatrapati Sanyogitaraje Issue : अवमान करणारा पुजारी सुधीरदास वादग्रस्तच!

नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यासह दुबईतही गुन्हे दाखल असल्याचा आरोप करण गायकर यांनी केला.
Sudhirdas Pujari
Sudhirdas PujariSarkarnama
Published on
Updated on

chhatrapati Sanyogitaraje & Priest issue : शंभर वर्षांपूर्वी छत्रपती शाहू महाराजांनी नाकारलेली व्यवस्था काही पुजाऱ्यांकडून आजही कायम असल्याची घटना नुकतीच उघड झाली. त्यात छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्यातील संयोगिताराजे यांनाच त्याचा अनुभव आला. यातील पुजारी सुधीरदास हा वादग्रस्त पुजारी असुन त्याच्या विरोधात पोलिसांत गुन्हे दाखल झाले होते, असा आरोप स्वराज्य संघटनेचे राज्य प्रवक्ता करण गायकर यांनी व्यक्त केला. असा वादग्रस्त पुजारी आपल्या सर्वांच्या मनात अत्यंत आदराचे स्थान असलेल्या काळाराम मंदीरात असावा का? असा प्रश्न त्यांनी केला. (Karan Gaikar asks serious Questions on Priest sudhirdas issue)

छत्रपती संयोगिताराजे भोसले (Chhatrapati Sanyogitaraje) यांनी समाजमाध्यमातून श्रीकाळाराम मंदिरातील (Nashik) सांगितलेला प्रकार खरा असून, त्यात कुठलेही दुमत नाही. परंतु मंदिरात उत्सव सुरू असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यामुळे संभाजीराजे छत्रपती यांच्या आदेशानुसार स्वराज्य पक्षातर्फे कुठलेही आंदोलन केले जाणार नाही, असे स्पष्टीकरण स्वराज्य संघटनेचे (Swarajya Sanghtana) राज्य प्रवक्ता करण गायकर (Karan Gaikar) यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले.

Sudhirdas Pujari
Jitendra Awhad News : संविधानाची प्रत हाती घेऊन केला काळाराम मंदिरात प्रवेश!

त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, की संयोगिताराजे भोसले यांनी समाज माध्यमांमध्ये टाकलेली पोस्ट हा त्यांना आलेला अनुभव सादर केला आहे. त्यांच्यासोबत अशा प्रकारचा अनुभव कुठल्या पुजारी किंवा महंतामुळे आला, त्या महंत सुधीरदास यांनी स्वतःहून माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिल्याने त्यांनीच हा प्रकार घडविला, हे स्पष्ट होते.

महंत सुधीरदास यांनी मी असे कुठलेही वर्तन केलेले नाही. मात्र संयोगिताराजे यांच्या भावना दुखावल्या असल्यास त्यांचे मन राखण्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हटले आहे. मात्र या संपूर्ण प्रकारात त्यांनी स्पष्ट माफी मागितली पाहिजे, अशी स्वराज्य पक्षाची मागणी आहे.

Sudhirdas Pujari
Nashik News : निधीसाठी जिल्हा परिषद दोनपर्यंत जागली!

वादग्रस्त पार्श्वभूमी

यासंदर्भात श्री. गायकर म्हणाले, यातील पुजारी सुधीरदास स्वःताला महंत म्हणवून घेतात. मात्र ते महंत नाहीत, अशी चर्चा आहे. त्यांना अखिल भारतीय निर्वाणी अनीने महंत केले होते. त्यांच्या गैरप्रकारांमुळे त्यांचे पद त्या अनीने नीरस्त केलेले आहे. तरीही हे स्वतःला महंत म्हणवून घेतात. मंदिराच्या विश्वस्त मंडळात ते नाहीत. तरीही ते मंदिरात येणाऱ्या सन्माननीय लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी परस्पर अवभगत करतात. या मंदिराच्या पुजेचा अधिकारा पुजारी कुटुंबाला आहे. त्यातील ते एक आहेत.

ते पुढे म्हणाले, श्री. पुजारी यांनी यापुर्वीही मराठा समाजाचा अपमान केल्याने मराठा क्रांती मोर्चातर्फे त्यांच्या विरोधात आम्ही तक्रार दिलेली होती. त्यांच्या विरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. त्यात एक अपहाराचा देखील आहे. त्यांनी दुबई येथे मालमत्तेचा घोटाळा केल्याचे बोलले जाते. त्याबाबत त्यांना दोन महिने डिटेन करण्यात आले होते. त्यावेळी काही खासदार व केंद्र सरकारमधील नेत्यांनी हस्तक्षेप केल्याने त्यांची सुटका झाल्याचे बोलले जाते. त्याच्या दुबईतील प्रकाराबाबत बातम्या प्रसिद्ध झालेल्या होत्या. यावेळी मात्र त्यांनी थेट छत्रपती संयोगिताराजे यांचा अवमान केला आहे, हे खपवून घेण्यासारखे नाही. सध्या मंदीरात रथोत्सव सुरु आहे. त्यामुळे आम्ही शांत आहोत. आमचा हा लढा पुरोहितांविरोधात नव्हे तर फक्त सुधीरदास या व्यक्ती विरोधात आहे.

Sudhirdas Pujari
Nashik Politics : मेळावा राष्ट्रवादी पक्षाचा; पण पहिल्या स्थानी फोटो झळकला शिंदे गटातील मंत्र्याचा !

सुधीरदास यांनी कोल्हापूरला जाऊन संभाजीराजे छत्रपती यांची जरूर भेट घ्यावी, असेही गायकर म्हणाले. समाज बांधवांनी कोणीही त्या ठिकाणी येऊन स्वराज्य पक्षातर्फे आंदोलन करू नये, ही भूमिका आहे. सत्य परिस्थिती समोर मांडावी आणि त्यांनी त्या ठिकाणी माफी मागावी एवढीच आमची माफक अपेक्षा असल्याचे गायकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com