Pune News : लोकसभा निवडणुकीत महायुतीला अनेक कारणांमुळे पराभवाचा फटका बसला. या निवडणुकीत भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणात घटल्या आहेत. या निवडणुकीत राज्यात सपाटून मार खाणाऱ्या भाजपने निराशाजनक कामगिरीची कारणमिमांसा सुरु केली आहे. त्यासाठी दोन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे युद्धपातळीवर शोधून त्याची अंमलबाजवणी केली जात आहे.
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायात पंचायत समित्यांसह महापालिकांच्या निवडणुका कोरोना काळापासून रखडल्या आहेत. जवळपास गेल्या अडीच वर्षांपासून निवडणूका झालेल्या नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर पाहावयास मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात हॊत असलेल्या विधानसभा निवडणुकीसोबतच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीची तयारी भाजपकडून (Bjp ) केली जात आहे. पुण्यात रविवारी होत असलेल्या भाजपच्या संमेलनात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या प्लॅनवर चर्चा होऊन शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. (Bjp News)
'या' स्थानिक स्वराज्य संस्थांंवर प्रशासकराज
सध्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासकाच्या हाती आहेत. त्यामध्ये राज्यातील २९ महागनरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद, 289 पंचायत समित्यांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून सध्या प्रशासकराज आहे, या विषयीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत.
विधानसभेबरोबरच महापालिकेची तयारी
पुण्यात 21 जुलैला भाजपचे संमेलन होणार आहे. त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संकेत दिले जाणार आहेत. विधानसभा निवडणुकी (Vidhansabha Election) बरोबरच महापालिकेची तयारी देखील भाजपने सुरू केली आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी भाजप वॉर्डनिहाय प्रत्येकावर जबाबदारी देणार आहे. यावेळी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वानी राज्य सरकारच्या सर्व योजना प्रत्येक वार्डात, विभागात पोहोचावाव्यात यासाठी भाजप बुथस्तरावर प्रयत्न करणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना यावेळी मार्गदर्शन केले जाणार असल्याचे समजते.
सर्वच निवडणुकींच्या तयारीचा आढावा
भाजपकडून सातत्याने बैठकांचे आयोजन केले जात असून त्यामध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे युद्धपातळीवर शोधून त्यावर उपाय केले जात आहेत. भाजपच्या बैठकीत आगामी महापालिका, जिल्हा-परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकींच्या तयारीचा देखील आढावा घेण्यात आला आहे. या निवडणुका संदर्भात देखील पक्षाने योजना आखल्याची माहिती समोर येत आहे.
लवकरच निवडणूक होण्याची शक्यता
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 21 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांतील मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे, राज्य निवडणूक आयोगानेही याबाबतही माहिती यापूर्वीच दिली होती. येत्या काळात याबाबत लवकरच निकाल येण्याची शक्यता असल्याने विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणुका होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.