Belapur Parli Railway Project : '104 वर्षे झाली, निर्णय कधी?' बेलापूर-परळी रेल्वे मार्गावर लोकसभेत प्रश्न; केंद्राने दिले महत्त्वाचे अपडेट

Bhausaheb Wakchaure raises the 104-year-old Belapur-Parli railway project in Parliament as the Railway Ministry shares the latest status on DPR and future approvals : खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी प्रकल्पाच्या भवितव्याबाबत सरकारला धारेवर धरले; DPR पूर्ण झाल्याची रेल्वेमंत्र्यांची माहिती
Belapur Parli Railway Project
Belapur Parli Railway ProjectSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Beed Railway : बेलापूर (श्रीरामपूर)–परळी रेल्वे मार्गाचा तब्बल 104 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न पुन्हा एकदा संसदेत घुमला आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करत या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाबाबत केंद्र सरकारची स्पष्ट भूमिका काय आहे, असा थेट सवाल केला. तसेच, प्रकल्प बंद किंवा स्थगित करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे का, याचीही त्यांनी विचारणा केली.

लोकसभेत बोलताना खासदार वाकचौरे यांनी सांगितले की, बेलापूर–परळी रेल्वे मार्गामुळे अहिल्यानगर (Ahilyanagar), बीड आणि परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार असून, या मार्गामुळे आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासाला नवी गती मिळू शकते. त्यामुळे अनेक दशकांपासून रखडलेल्या या प्रकल्पाबाबत केंद्र सरकारने ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यासोबतच या रेल्वे मार्गाच्या पुनरुज्जीवनासाठी संबंधित लोकप्रतिनिधी आणि रेल्वे (Railway) अधिकाऱ्यांची संयुक्त उच्चस्तरीय बैठक बोलावून पुढील दिशा निश्चित करण्याची मागणीही त्यांनी केली.

Belapur Parli Railway Project
Nashik Pune Railway via Sangamner : नाशिक–पुणे रेल्वेमार्ग संगमनेर मार्गेच होणार? मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचा अमोल खताळांचा दावा

खासदार वाकचौरे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले की, बेलापूर–परळीदरम्यान सध्या थेट रेल्वे मार्ग अस्तित्वात नाही. मात्र, या परिसरातील रेल्वे संपर्क अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध रेल्वे विकास प्रकल्पांवर काम सुरू आहे.

Belapur Parli Railway Project
EPS-95 Pension : 'पेन्शनधारक एकत्र आले तर आमदार-खासदार बदलू शकतात'; 'चलो दिल्ली' आंदोलनापूर्वी संघटनेचा इशारा

मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 236 किलोमीटर लांबीचा वांबोरी–मनमाड दुहेरीकरण प्रकल्प 3,629 कोटी रुपयांच्या खर्चातून पूर्ण करण्यात आला असून तो कार्यान्वित झाला आहे.

तसेच, अहिल्यानगर–बीड–परळी वैजनाथ सुमारे 201 किलोमीटर रेल्वे प्रकल्पाचे सर्वेक्षण आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) पूर्ण झाला असून, या प्रकल्पाबाबत पुढील निर्णयासाठी नीती आयोग, केंद्रीय वित्त मंत्रालय आणि संबंधित राज्य सरकारांशी समन्वयाची प्रक्रिया सुरू असल्याचेही रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पुन्हा चर्चेत आला रखडलेला प्रकल्प

लोकसभेत हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेलापूर–परळी रेल्वे मार्गाचा प्रश्न पुन्हा राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला आहे. या मार्गाची दीर्घकाळापासून प्रतीक्षा करणाऱ्या श्रीरामपूर, अहिल्यानगर, बीड आणि परळी परिसरातील नागरिकांच्या अपेक्षा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत. आता केंद्र सरकार या प्रकल्पाबाबत नेमका कोणता निर्णय घेते, याकडे संबंधित जिल्ह्यांसह संपूर्ण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com