Shiv Sena vs Congress : एड्स झालेल्या महिलांचं अनुदान लाटलं, शेण खाल्लं..; संजय गायकवाडांनी सपकाळांचं सर्वच काढलं

Sanjay Gaikwad from Eknath Shinde Shiv Sena Makes Serious Allegations Against Congress Leader Harshwardhan Sapkal : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना प्रत्युत्तर देताना, आमदार संजय गायकवाड यांनी जोरदार टोलेबाजी केली.
Sanjay Gaikwad
Sanjay GaikwadSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics news : राज्यातील सत्ताधारी आमदारांना 21 डिफेंडर वाहनं एका ठेकेदारांनं वाटल्याचा सणसणाटी आरोप केला आहे. आता 21 आहेत की, 22 याचा शोध घ्यावा लागेल, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला होता.

यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बुलढाणा इथले आमदार संजय गायकवाड यांनी सपकाळांना जोरदार प्रत्युत्तर देताना, '21वी की, 22, शोध म्हणाव. तू आमदार असताना बुलढाणा शहरातील चांगल्या चांगल्या घराच्या महिलांचं, तुझ्या एड्स झालेल्या यादीत होत्या . त्याचं अनुदान लाटत होता, त्याचाही शोध घे,' असा घणाघात संजय गायकवाड यांनी केला.

हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी, मागच्या काळामध्ये सत्ताधारी आमदारांविरोधात "पन्नास खोके एकदम ओके", ही घोषणा गाजली होती. आता, ऐन दिवाळीत एका ठेकेदाराने सत्ताधारी पक्षातील 21 आमदारांना 21 डिफेंडर कार भेटस्वरूपात दिल्या आहेत. यातील एक गाडी बुलढाण्याची देखील आहे. ते 21 लाभार्थी आमदार कोण आहेत? या गाड्या भेट करणारा ठेकेदार कोण आहे? आणि सत्ताधारी आमदारांना या गाड्या का बरं भेट म्हणून दिल्या जात आहेत? या पाठीमागे काय गौडबंगाल आहे, हे लवकरच सर्वांसमोर येईल, अशी मला खात्री आहे, अशी पोस्ट 'एक्स'वर शेअर केली होती.

बुलढाणा इथले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) आमदार संजय गायकवाड यांच्या डिफेंडर कारवरून चांगलाच वाद गाजत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी यात आरोप करत अधिकच धुरळा उडवून दिला. यावर संजय गायकवाड यांनी, 'आमदारांवर कुणी काय आरोप करत असेल, तर त्यांनी पाहिले सिद्ध केले पाहिजे . बिनबुडाचे आरोप करून प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी, असे स्टेटमेंट हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष करत असतो', असा टोला लगावला.

Sanjay Gaikwad
Malegaon fake birth registration : मालेगावात 3977 बनावट जन्म दाखले रद्द; 811 आरोपी, 47 वकिलांना अटक, 125 एजंट अन् 35 अधिकाऱ्यांवर कारवाई

वाहनावर वापरत असलेल्या सिम्बॉलवर संजय गायकवाड म्हणाले, "वाहनावरील सिम्बॉल मला विधानसभेने दिला आहे. तुझ्या गाडीवर ही सिम्बॉल होता. दिल्लीपासून गल्लीपर्यंत आमदारांच्या गाडीला सिम्बॉल आहेत. बुलढाणा इथल्या काँग्रेस आमदाराच्या वाहनावर देखील सिम्बॉल आहे. देशभरात असलेले काँग्रेस आमदार अन् खासदार यांच्या वाहनावर सिम्बॉल आहेत. तू अध्यक्ष असताना काढायला सांगतो का? तुम्ही तमाशा का लावला म्हणून, बोल तुझे आमदार-खासदारांना, सिम्बॉल लावणे म्हणजे तमाशा करणे आहे म्हणून."

Sanjay Gaikwad
Amit Shah Ahilyanagar visit : अमित शहांचा थेट विवेक कोल्हेंना फोन; अन् वातावरण फिरलं...

हर्षवर्धन सपकाळ यांनी डिफेंडर गाडी 21वी की, 22वी, याचा शोध घ्यावा लागेल, असे विधान केले होते. यावर संजय गायकवाड यांनी, 'शोध म्हणाव . तू आमदार असताना बुलढाणा शहरातील चांगल्या-चांगल्या घराच्या महिला तुझ्या एड्स झालेल्या यादीत होत्या. त्याचे अनुदान लाटत होता, त्याचाही शोध घे. आपण काय शेण खात होतो', असा घणाघात केला.

हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांचा दिवाळीनंतर घोटाळा काढणार असल्याचा इशारा दिला आहे. यावर संजय गायकवाड म्हणाले, "सरकारला शेतकऱ्यांना देण्यासाठी पैशाची तडजोड करावी लागत आहे. लाडक्या बहिणीचे पैसे देण्याकरता कसरत करावी लागत आहे . वर्षभरात एक काम झाले नाही आणि हा कुठून घोटाळा शोधणार? घोटाळा वगैरे काही नाही." नवीन आमदारांना पाच कोटी रुपये विकास कामांसाठी दिले आहेत, असेही संजय गायकवाड यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com