Shrirampur Car Bonnet Drama : श्रीरामपूरात भरदिवसा थरार! चालत्या कारच्या बोनेटवर सासू; जावयाने सुसाट कार पळवली

Family dispute turns into dramatic moving car bonnet incident in Shrirampur : राहुरीतील युवक आणि श्रीरामपूरातील युवतीच्या आंतरजातीय विवाहानंतर न्यायालयाबाहेर कौटुंबिक वाद उफाळला; अखेर राजकीय मध्यस्थी आणि पोलिसांच्या हस्तक्षेपाने प्रकरण मिटले.
Shrirampur Car Bonnet Drama
Shrirampur Car Bonnet DramaSarkarnama
Published on
Updated on

summary

  • Shrirampur mother-in-law hangs on moving car bonnet

  • Intercaste marriage dispute in Shrirampur

  • Family drama outside Shrirampur court

  • Viral Shrirampur car bonnet incident

Shrirampur News : ‘दृश्यम’ चित्रपटातील सस्पेन्स आणि ‘पुष्पा’ किंवा ‘सिंघम’सारख्या ब्लॉकबस्टर साऊथ ॲक्शनपटातील क्लायमॅक्सलाही मागे टाकेल असा थरारक, ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ श्रीरामपूर शहरात भरदिवसा घडला.

कौटुंबिक वादाच्या ठिणगीतून जावयाने चालू कारच्या बोनेटवर सासूला टांगून रस्त्यावरून सुसाट कार पळवली. चित्रपटाला शोभेल अशा या थराराचा अखेर सय्यदबाबा चौकात नागरिकांनी प्रसंगावधान राखून गाड्या आडव्या लावल्याने आणि भावाने काचेवर दगडफेक केल्याने 'द एन्ड' झाला.

​मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील केसापूर येथील एका युवकाचे श्रीरामपुरातील युवतीशी तीन महिन्यांपूर्वी आळंदी येथे आंतरजातीय विवाह केला होता. या प्रकरणातील कायदेशीर प्रक्रियेच्या अनुषंगाने हे नवदाम्पत्य श्रीरामपूर न्यायालयात (Court) आले होते. न्यायालयीन कामकाज आटोपून दोघेही परतण्याच्या तयारीत असतानाच, प्रवेशद्वारावर मुलीचे नातेवाईक, आई आणि भाऊ दाखल झाले. त्यांनी तेथे अचानक गाठून जोरदार गोंधळ घातला.

नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा पाहून युवकाने कार सुसाट पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त झालेल्या मुलीच्या आईने जिवाची कसलीही पर्वा न करता थेट चालू कारच्या बोनेटवर उडी घेतली. सासू बोनेटवर लटकलेली असतानाही युवकाने ब्रेक न दाबता कार श्रीरामपूरच्या (Shrirampur) सय्यदबाबा चौकाच्या दिशेने सुसाट दामटली. "माझ्या मुलीला वाचवा" असा टाहो फोडत ती महिला कसाबसा जीव सांभाळत होती.

Shrirampur Car Bonnet Drama
Election Age 21 : Gen-Z आंदोलनाचा प्रभाव; 21 वर्षांचे युवकही लढवणार लोकसभा-विधानसभा निवडणूक? रेवंत रेड्डींचा केंद्राला प्रस्ताव

​दरम्यान, दुचाकीवरून पाठलाग करणाऱ्या मुलीच्या भावाने सय्यदबाबा चौकात कार गाठून थेट समोरील काचेवर मोठा दगड मारला. यामुळे काच चक्काचूर झाली. त्याचवेळी महिलेचा आक्रोश आणि मुलीचे अपहरण होत असल्याच्या संशयावरून चौकातील स्थानिक नागरिक व युवकांनी तातडीने स्वतःच्या गाड्या कारसमोर आडव्या लावल्या. चारही बाजूंनी रस्ता रोखल्याने अखेर कार थांबली आणि काही किलोमीटर चाललेला हा थरार नाट्य संपुष्टात आले.

Shrirampur Car Bonnet Drama
Maharashtra Forest Land : महाराष्ट्रातील 63 लाख हेक्टर झुडपी जंगलांच्या वाटपात गैरप्रकार; माजी उपवनसंरक्षकाची थेट राष्ट्रपती, पंतप्रधानांसह CJI यांच्याकडे तक्रार

राजकीय मध्यस्थीने सुखांत

​या नाट्यमय घडामोडींनंतर हे प्रकरण थेट श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात पोहोचले. तिथे युवकाने सासूविरोधात कोणतीही तक्रार नाही, असा समंजस सूर घेतला. दुसरीकडे, मुलीला सोबत नेण्यावर ठाम असलेल्या सासूला त्यांच्याच गावातील राजकीय मंडळींनी मध्यस्थी करत समजावले.

विवाह कायदेशीर; लोकप्रतिनिधींनी काढली समजूत

"मुलगा आणि मुलगी दोन्ही सज्ञान असून त्यांचा विवाह कायदेशीर झाला आहे, त्यामुळे हे वास्तव स्वीकारणेच योग्य ठरेल," अशा शब्दांत लोकप्रतिनिधींनी तिची समजूत काढली. राजकीय नेते आणि पोलिसांच्या मध्यस्थीनंतर नातेवाईकांनी माघार घेतल्याने या हाय-व्होल्टेज नाट्यावर अखेर पडदा पडला. पोलिसांनीही स्टेशन डायरीमध्ये या घटनेची रीतसर नोंद करत प्रकरणावर कायदेशीररीत्या फुली मारली.

FAQs

प्रश्न 1. श्रीरामपूरमध्ये नेमके काय घडले?

उत्तर: आंतरजातीय विवाहानंतर झालेल्या कौटुंबिक वादातून चालत्या कारच्या बोनेटवर महिला लटकलेली असताना कार पळविण्याची घटना घडली.

प्रश्न 2. हा वाद का झाला?

उत्तर: न्यायालयाबाहेर मुलीच्या नातेवाईकांनी दाम्पत्याला अडवल्यानंतर वाद निर्माण झाला.

प्रश्न 3. या घटनेत कोणी जखमी झाले का?

उत्तर: गंभीर दुखापतीची माहिती समोर आलेली नाही.

प्रश्न 4. विवाह कायदेशीर होता का?

उत्तर: होय. दोघेही सज्ञान असून त्यांचा विवाह कायदेशीर असल्याचे सांगण्यात आले.

प्रश्न 5. पोलिसांनी गुन्हा दाखल केला का?

उत्तर: पोलिसांनी स्टेशन डायरीत नोंद केली असून औपचारिक तक्रार दाखल झालेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com