Shrirampur Politics: श्रीरामपूर बाजार समितीच्या सचिव पदावरून सुंदोपसुंदी कायम

Srirampur Market Committee Ahmednagar News:पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या निकालानंतर सहायक निबंधकांच्या उपस्थितीत सचिव किशोर काळे यांनी काल पदभार घेतला
Srirampur Market Committee
Srirampur Market CommitteeSarkarnama

Ahmednagar News: श्रीरामपूर बाजार समितीच्या (Srirampur Market Committee) सचिव पदावरून सुरू असलेली सुंदोपसुंदी कायम आहे. यातच पणनमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिलेल्या निकालानंतर सहायक निबंधक यांच्या उपस्थितीत सचिव किशोर काळे (Kishore Kale) यांनी नुकताच पदभार घेतला. प्रभारी सचिव रजेवर असल्याने व संचालकांशी चर्चा करावी लागण्याची सबब पुढे करत सभापती सुधीर नवले यांनी कानावर हात ठेवत संचालकांची तातडीची बैठक बोलावली, तर काळे यांनी एकतर्फी पदभार घेतला. त्यामुळे पदभार नाट्याचा अंक सुरू आहे.

तत्कालीन सचिव काळे यांना पदावरून हटवल्यावर त्यांनी त्याला आव्हान दिले होते. त्यांच्या बाजूने निकाल लागल्यावर त्यांना हजर करून घ्यावे, असा आदेश विभागीय सहनिबंधक नाशिक यांच्यासह पणनमंत्री यांनी दिला. मात्र, या विरोधात बाजार समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर निर्णय होऊन पणनमंत्री यांनी १५० दिवसांत निर्णय घेण्याचा आदेश कायम ठेवला होता. तोपर्यंत साहेबराब वाबळे हे प्रभारी सचिव म्हणून काम पाहतील, असा निर्णय दिला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रकरणी पणनमंत्री यांच्याकडे पुन्हा सुनावणी होऊन १ मार्चला त्यांनी काळे यांच्या बाजूने निकाल दिला. त्याची प्रत ईमेलद्वारे बाजार समितीकडे पोहोचण्याआधीच काळे सहायक निबंधक संदीप रुद्राक्ष यांच्यासह दाखल झाले. या वेळी वाबळे हे रजेवर असल्याने त्यांच्या गैरहजेरीत पदभार देता येणार नाही, अशी भूमिका सभापती नवले यांनी मांडली. यासाठी कायदेशीर सल्लागाराशी बोलावे लागेल. तसेच संचालकांची तातडीची बैठक घ्यावी लागेल, असे स्पष्ट केले. या वेळी त्यांची सहायक निबंधकांशी थोडी हुज्जत झाली.

Srirampur Market Committee
Konkan Politics: कोकणातील राजकारण तापलं; भाजप- राष्ट्रवादी वादात आता शिंदेंच्या शिवसेनेची उडी

बाजार समितीवर प्रशासक आल्यावर दत्तात्रय कचरे यांनी काळेंच्या विरोधात जिल्हा उपनिबंधकांकडे संस्थेतील आणि पेट्रोल पंपावरील आर्थिक अनियमिततेबाबत तक्रार केली होती. निवडणुकीदरम्यान संचालकांकडे असलेली थकबाकी आणि सत्तेवर आल्यानंतर केलेल्या वसुलीमुळे १४ लाख रुपये जमा झाले. मात्र, उर्वरित १४ लाख रुपये कोणाकडून घ्यायचे. त्यामुळे या प्रकरणी न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेत मंत्री यांच्या निर्णयानंतर पुन्हा दाद मागण्यात आल्याचे नवले यांनी सांगितले.

मंत्र्यांनी निकाल आपल्या बाजूने दिल्याने सहायक निबंधकांसह पदभार घेण्यासाठी गेले होते. मात्र, प्रभारी सचिव वाबळे हे रजेवर होते. सभापतींनी पदभार देण्यासाठी संचालकांची बैठक घ्यावी लागेल, असे सांगून बैठकही बोलावली आहे. परंतु आपण आज एकतर्फी पदभार घेतल्याचे काळे यांनी सांगितले.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com