Konkan Politics: कोकणातील राजकारण तापलं; भाजप-राष्ट्रवादी वादात आता शिंदेंच्या शिवसेनेची उडी

Raigad Lok Sabha Constituency 2024: रायगड लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून राजेश साबळे यांच्या नावाची घोषणा स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Raigad Politics : कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या (Raigad Lok Sabha Constituency 2024) जागेवरून महायुतीमध्ये दावे-प्रतिदावे सुरू आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघातही राष्ट्रवादी व भाजपमध्ये चढाओढ सुरू आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेनेही या जागेवर आपला उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू केली आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात आता भाजप राष्ट्रवादीमध्ये वाद सुरू असतानाच आता यात शिवसेनेनेही उडी घेतली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून राजेश साबळे (Rajesh Sable) यांच्या नावाची घोषणा स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात माणगाव येथील शिवसेनेचे पदाधिकारी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रायगडमध्ये आमचे तीन आमदार असताना आम्ही ही सीट का सोडावी, असा प्रश्न करत एक आमदार असताना भाजप व राष्ट्रवादी जर का ते सीट मागत असतील तर मग आम्ही ही जागा का सोडावी, असा खडा सवालच शिवसेनेकडून लोकसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार राजेश साबळे व शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Yashwant Sakhar Karkhana Election : शेतकरी विकास आघाडीनं मात्तबरांना घेरलं, प्रशांत काळभोरांनी विरोधकांना केला 'हा' सवाल

आपण स्वतः यापूर्वी विधान परिषद निवडणूक लढवली आहे, जरी पराभव झाला असला तरी आमचा जनसंपर्क आहे. आपण चार वेळेला जिल्हा परिषद गटाच्या चार वेगवेगळ्या मतदारसंघांतून निवडून आलो आहे.

त्यामुळे या रायगड लोकसभेच्या जागेसाठी मी शंभर टक्के इच्छुक असून, आणि निश्चितपणे आपण या उमेदवारीची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊन करणार आहोत, अशीही माहिती राजेश साबळे यांनी दिली.

त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग व रायगड लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून रणकंद माजले आहे. या सगळ्यासंदर्भात आता महायुतीचे नेते नेमका कोणता निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिला आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com