

Tree Cutting Controversy News: नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण शनिवारी राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर जगद्गुरू नरेंद्राचार्य यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या विविध भूमिकांचे समर्थन केले आहे. कर्जत परिसरातील वीज प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीवरून प्रश्न उपस्थित होत असताना, त्यांनी ‘तुम्हाला वीज हवी की नको?’ असा प्रतिप्रश्न केला. यावेळी त्यांनी मंत्री नितेश राणे यांच्या भुमिकेची पाठराखण केली.
सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण शनिवारी राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर जगद्गुरू नरेंद्राचार्य यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. त्यांनी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमहंत ज्ञानदास महाराज यांची भेट घेतली. त्यानंतर आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत संजय दास आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर शासनाच्या भूमिकेचे समर्थन केले.
भीमाशंकर अभयारण्य अशी निगडित कर्जत भागातील झाडांची तोड करण्यात येत आहे. टोरंटो कंपनीच्या प्रकल्पासाठी ही वृक्षतोड सुरू आहे.त्यावर राज्यभरातून तीव्र निषेध आणि आंदोलन सुरू आहे. या वृक्षतोडीचे समर्थन करता का, असा प्रश्न विचारण्यात आला असता नरेंद्राचार्य यांनी, ‘तुम्हाला वीज हवी की नको?’ असा प्रतिप्रश्न केला. या विषयावर विरोधी पक्ष राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्य शासनावर त्यांच्याकडून होणारी टीका हा त्याच राजकारणाचा भाग आहे असे ते म्हणाले.
नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधूग्राम परिसरातील वृक्षतोडीवरून पर्यावरणप्रेमी आणि न्यायालयीन पातळीवर संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर झाडे तोडणे कुंभमेळ्यासाठी आवश्यक आहे. त्याशिवाय कुंभमेळा कसा होणार? साधू ग्राम ची उभारणी कुठे होणार? असा प्रश्न त्यांनी केला. राज्य शासनाकडून वृक्षतोडीला पर्याय म्हणून अन्यत्र झाडे लावण्याचे काम सुरू आहे. राज्य शासनाला विकासाच्या विषयावर काही भूमिका घ्यावीच लागते. त्या दृष्टीने झाडे तोडल्यास त्याला पर्याय म्हणून अन्यत्र झाडे लावण्याची सरकारची भूमिका आहे. त्यामुळे काही झाडे तोडणे अपरिहार्य असल्याचे नरेंद्रचार्य म्हणाले.
सिंहस्थ कुंभमेळ्यात मुस्लिम समाजाने दुकाने लावू नयेत, अशी भूमिका मंत्री निलेश राणे यांनी मांडली होती. त्यावर आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत संजय दास यांनी वेगळी भूमिका घेत, हिंदू आणि सनातन धर्माची परंपरा व्यापक असून अन्य धर्मीय सहभागी होऊ इच्छित असतील, तर त्यांचे स्वागत करायला हवे, असे म्हटले होते.
या पार्श्वभूमीवर नरेंद्राचार्य यांनी मात्र निलेश राणे यांच्या भूमिकेला समर्थन दिले. सिंहस्थ कुंभमेळा हा हिंदू धर्मीयांचा मोठा उत्सव असल्याचे सांगत, त्यात बिगर हिंदूंनी दुकाने लावणे किंवा सहभागी होणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.