Manikrao Kokate Politics: रम्मी प्रकरण; संतप्त माणिकराव कोकाटे म्हणतात, रोहित पवार यांनी माझी राज्यभर बदनामी केली!

Sports Minister Manikrao Kokate is adamant, Rohit Pawar defamed me, I can't even play Rummy -क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला.
Manikrao-Kokate
Manikrao-KokateSarkarnama
Published on
Updated on

Kokate Vs Rohit Pawar News: विधिमंडळाच्या सभागृहात क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यावरून आता कायदेशीर लढाई सुरू झाली आहे.

यासंदर्भात क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिकच्या न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. या दाव्याची छाननी सोमवारी झाली. यावेळी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे न्यायालयात उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी कोकाटे यांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केला होता. श्री कोकाटे रमी खेळत असल्याचे या व्हिडिओतून स्पष्ट झाले. त्यामुळे राज्यभर तत्कालीन कृषिमंत्री कोकाटे यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

Manikrao-Kokate
Eknath Shinde Politics: खड्डे प्रश्नावर शिवसेना शिंदे पक्षाला उशिरा जाग, त्यातही जखम डोक्याला आणि मलम पायाला!

कृषिमंत्री कोकाटे रमी खेळत असल्याच्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांपासून तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह मंत्रिमंडळातील अनेकांना खुलासा करावा लागला होता. यावरून विरोधकांनी रान उठवले होते. त्यामुळे श्री कोकाटे यांचे कृषिमंत्री पद काढून घेण्यात आले.

Manikrao-Kokate
Nashik Police News: आदिवासी युवकाच्या खून प्रकरणाला धक्कादायक वळण, आईनेच घरात लपवल्याचा दावा.

या प्रकरणात श्री कोकाटे यांनी आमदार रोहित पवार यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला आहे. आमदार पवार यांनी तो व्हिडिओ कुठून आणला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तो व्हिडिओ मॉर्फ केलेला होता, असा दावा मंत्री कोकाटे यांनी केला आहे.

मला रमी खेळता येत नाही. सभागृहात मोबाईलवर सर्फीग करत असतानाचा फोटो घेण्यात आला. तोच व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्यामुळे माझी आणि पक्षाची राज्यभर बदनामी झाली असा दावा मंत्री कोकाटे यांनी केला आहे.

या प्रकरणात आमदार रोहित पवार यांच्यावर खटला दाखल झाला आहे. या प्रकरणात त्यांना माझी बदनामी केल्याची किंमत चुकवावी लागेल. यामध्ये आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, असा ठाम दावा कोकाटे यांनी केला आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com