Lok Sabha Election: भाजपमधून आयात केलेल्या व्यक्तीला उमेदवारी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीनाट्य

Sharad Pawar NCP News: एका दिवसापूर्वी पक्षात आलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली आणि अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात येत असल्याचा आरोप शरद पवार गटाचे कार्यकर्ते करत आहेत.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Raver Lok Sabha constituency: भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेले उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पाटील (Sriram Patil) यांना रावेर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नाराजीनाट्य समोर आलं आहे.

पक्षाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटातील अनेक नाराज पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे, तर माजी आमदार संतोष चौधरी (Former MLA Santosh Chaudhary) बंडाच्या तयारीत आहेत. त्यामुळे जळगावमध्ये हा शरद पवार गटाला मोठा धक्का असल्याचे मानलं जात आहे.

रावेर मतदारसंघातून लोकसभेसाठी (Raver Lok Sabha Election) भाजपच्या उमेदवार तथा विद्यमान खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या विरोधात उद्योजक श्रीराम पाटील यांची लढत होणार आहे. परंतु, एका दिवसापूर्वी पक्षात आलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली आणि अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात येत असल्याचा आरोप जळगाव जिल्ह्यातील शरद पवार (Sharad Pawar) गटाचे कार्यकर्ते करत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेल्या श्रीराम पाटील यांची राजकीय कारकीर्द अवघ्या दोन महिन्यांची आहे. त्यांनी 14 फेब्रुवारीला भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपकडून रावेर मतदारसंघाची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु भाजपने तिसऱ्यांदा विद्यमान खासदार रक्षा खडसेंनाच संधी दिल्यामुळे पाटील नाराज झाले आणि त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरली.

Sharad Pawar
Dhule Lok Sabha Election 2024 : काँग्रेस नेत्यांची नाराजी दूर करणे निवडणूक जिंकण्याएवढेच दिव्य!

भाजपत नाराज झालेल्या श्रीराम पाटील यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने उमेदवारी दिली पण पक्षाच्या या निर्णयामुळे जुने कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज झाले आहेत. काल पक्षात आलेल्या लोकांना उमेदवारी मिळते आणि अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करणाऱ्यांना डावललं जातंय, असं म्हणत जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) शरद पवार गटाला अनेक कार्यकर्त्यांनी राम राम ठोकला आहे. त्यामुळे आता शरद पवार या प्रकरणावर नेमका काय तोडगा काढणार? याकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

Sharad Pawar
Ambadas Danve On Ashish Shelar : अशिष शेलारांच्या कवितेला अंबादस दानवेंचे कवितेतूनच प्रत्युत्तर, ट्विटरवर रंगला सामना

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com