Dhule Lok Sabha Election 2024 : काँग्रेस नेत्यांची नाराजी दूर करणे निवडणूक जिंकण्याएवढेच दिव्य!

Congress News : धुळ्यातील राजीनामे दिलेल्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करण्याबाबत काँग्रेस नेत्यांमध्येच मोठी उदासीनता
Shobha Bachhav
Shobha Bachhavsarkarnama
Published on
Updated on

धुळे मतदारसंघात काँग्रेसनं माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव ( Shobha Bachhav ) यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्याच्या तीव्र प्रतिक्रिया कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उमटल्या. धुळे काँग्रेसचे अध्यक्ष शाम सनेर आणि नाशिकचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी उमेदवाराबाबत नाराजी व्यक्त करत पदांचे राजीनामे दिले आहेत. त्यांच्यासमवेत अनेक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही राजीनामे दिले आहेत. त्यानंतर शोभा बच्छाव यांनी मालेगावच्या कार्यालयात भेट दिली. या वेळी त्यांना मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला.

धुळे लोकसभा मतदारसंघात ( Dhule Lok Sabha constituency ) भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे ( Subhash Bhamare ) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या उमेदवारीबाबत पक्षाच्या अन्य इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांनीदेखील नाराजी व्यक्त केली होती. डॉ. भामरे यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी अथक प्रयत्न सुरू केले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेण्यावर त्यांचा भर आहे. ही नाराजी दूर करण्यात त्यांना काही प्रमाणात यश आले आहे. अशी स्थिती काँग्रेस पक्षात मात्र अद्याप दिसून आलेली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसचे उमेदवार जाहीर होऊन दोन दिवस झाले आहेत. डॉ. बच्छाव यांना मदत करण्यासाठी अद्याप वरिष्ठ नेत्यांकडून फारशा सूचना किंवा अन्य मदत दिल्याचे दिसून आलेले नाही. राजीनामे दिलेल्या पदाधिकाऱ्यांशी कोणत्याही वरिष्ठ नेत्यांनी संपर्क केलेला नाही. त्यामुळे धुळे मतदारसंघातील उमेदवाराबाबतची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसमध्ये उदासीनता दिसते. ही उदासीनता पक्षाला निवडणुकीच्या प्रचारापासून दूर करण्यात मोठी भूमिका बजावू शकते. त्यामुळे मतदारसंघात वातावरण निर्मिती करण्याचं आव्हान उमेदवारापुढे निर्माण झालेले आहे.

काँग्रेस पक्षात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोठा विसंवाद आहे. त्यामुळे निवडणूक प्रचाराबाबत समन्वय निर्माण करण्यासाठी यंत्रणा तयार करणे हे एक आव्हान आहे. उमेदवार मतदारसंघ बाहेरचा असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांना एकत्र करणे अद्याप शक्य झालेली नाही. अशा स्थितीत महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये संपर्क देखील होऊ शकलेला नाही. त्यामुळे तीन पक्षांत समन्वय आणि एकोप निर्माण करणं हे मोठं आव्हान आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवाराला काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना सक्रिय करणे हे सध्या तरी निवडणूक जिंकण्याएवढेच अवघड झालेले दिसते. धुळे मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मोठा सूर आहे. विरोधकांना अनुकूल स्थिती असताना पक्षांतर्गत समन्वय आणि उमेदवाराची निवड याबाबत मतदारांमध्येदेखील नाराजीचा सूर झिरपू लागला आहे. या मतदारसंघातील राजकीय कोंडी दूर करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यात वरिष्ठ नेत्यांना मतदारसंघात येऊन मुक्काम ठोकावा लागणार आहे. काँग्रेसमधील गटबाजीची तीव्र प्रतिक्रिया मतदारसंघातदेखील उमटली आहे. मतदारांमध्ये याबाबत नाराजी आहे. त्यामुळे उमेदवाराला प्रभावी यंत्रणा निर्माण करण्यासाठी कोण मदतीला येतो, याची उत्सुकता आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com