State Bank Robbery : जामिनावरील पोलिस अधिकाऱ्याचा स्टेट बँकेवर दरोडा, 27 किलो सोने अन् चार लाख रोकड...

Crime News : निलंबित पोलिस अधिकाऱ्याने आपल्या साथीदारांसह बँकेवर सशस्त्र दरोडा टाकला. जळगावला भर दिवसा बँक दरोड्याने खळबळ उडाली आहे.
Uber driver robbery and murder case
Uber driver robbery and murder caseSarkarnama
Published on: 
Updated on: 

Crime News : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जळगावमधील भोकर शाखेवर शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास दरोडा पडला. पाच सशस्त्र संशयितांनी बँकेत घुसून कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून रोकड आणि बँकेत ठेवलेले सोने असलेल्या पाच बॅगा घेऊन दुचाकीवरून पळ काढला. बॅगांमध्ये 27 किलो सोने आणि चार लाख रोकड होती.

दरोडेखोर बाहेर पडल्यावर कर्मचाऱ्यांनी बँकेचा अलार्म वाजवला. त्यामुळे नागरिकाने विशेषत तरुण सक्रिय झाले. परिसरातील विनोद निथुर डिकसाई या गावातील तरुणांनी दुचाकीवरून दरोडेखोरांचा पाठलाग केला. यावेळी त्यांची दरोडेखोरांची झटापटही झाली.

जळगावच्या दिशेने पळून जाणाऱ्या दरोडेखोरांना विनोद गावातील तरुणांनी अटकाव केला. त्यांच्याशी झटापट आणि जीवघेणा संघर्ष केला. ट्रॅक्टरची ट्रॉली लावून रस्ता अडवल्यावर यातील एक दरोडेखोर पकडण्यात यश आले. दुसरा दरोडेखोर मात्र शेतात पळून गेल्याने पसार झाला.

डिक्साई येथे देखील दरोडेखोरांना युवकांनी अडवले. यावेळी पकडलेला दरोडेखोर शंकर रमेश जासक हा 2023 मध्ये निलंबित झालेला पोलीस अधिकारी निघाला. त्याने बँकेत सफाई कर्मचारी असलेल्या नातेवाईकाच्या मदतीने हा दरोडा टाकला होता. दरम्यान, पोलिसांनी 27 किलो सोने आणि चार लाख रोकड जप्त केली आहे.

अटक केलेल्या आरोपींचे नाव शंकर रमेश जासक (वय 42, रा. खेडी इस्कॉन मंदिराजवळ), गजानन राजेंद्र पवार (32, न्याय डोंगरी, ता. नांदगाव, जि. नाशिक ), अंकुश तुळशीराम चव्हाण (खापरखेडा), अंकुश श्रावण चव्हाण (रामदेव वाडी) अशी आहेत.

फरार आरोपींचा शोध सुरू

पोलिसात दरोड्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. उर्वरित दोन दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथक रवाना केले आहे. भर दिवसा आणि तेही चक्क बडतर्फ पोलीस अधिकाऱ्यांचे दरोड्याची संबंध निघाल्याने खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.