राज्याचे मंत्री गिरीश महाजनांना सुटेना दूध संघाच्या सत्तेचा मोह

जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत गिरीश महाजन, मंगेश चव्हाण, रवींद्र पाटील यांसह १७९ अर्ज
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : जळगाव जिल्हा (Jalgaon) दूध उत्पादक संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी तब्बल १७९ अर्ज दाखल झाले. आज (शुक्रवारी) उमेदवार अर्जांची छाननी होणार आहे. गिरीश महाजन (Girish Mahajan) राज्याचे मंत्री आहेत, मात्र त्यांनाही जिल्हा दूध संघाची (Milk fedration) सत्ता खुणावत असल्याने या दूध संघात आहे तरी काय, याची चर्चा आहे. (Girish mahajan is a minister but still he had a temptation of milk fedration)

Girish Mahajan
खडसेंना चकविण्यासाठी गिरीश महाजनांनी १५ मिनिटांत नियमच बदलला!

उमेदवारी अर्ज विक्री व भरण्याच्या अखेरच्या दिवशी निवडणूक कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गुरुवारी १२ अर्जांची विक्री झाली, तर तब्बल १७९ उमेवारी अर्ज दाखल करण्यात आले. शुक्रवारी सकाळी अकरा वाजेपासून उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे.

Girish Mahajan
दूध संघाच्या चौकशीतील परदेशींना निलंबीत करा!

मंत्र्यासह दिग्गज मैदानात

दूध संघाच्या संचालकपदासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे आमदार मंगेश चव्हाण, शिंदे गट शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्या पत्नी सौ.छाया देवकर,मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक अरविंद देशमुख यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे निवडणूकीत मोठी चुरस होण्याची शक्यता आहे.

आमदार चव्हाण यांचा मुक्ताईनगरातून अर्ज

भारतीय जनता पक्षाचे चाळीसगाव येथील आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव तालुका मतदार संघातून अर्ज दाखल केला आहे.त्या सोबतच त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातून अर्ज दाखल केला आहे. दुसऱ्या तालुक्यातील मतदार संघात अर्ज दाखल करणारे ते एकमेव उमेदवार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com