Rahul Gandhi Hindutva controversy : राहुल गांधींचा हिंदुत्वाचा प्रचार रोखण्याचा आदेश; विरोधकांचा आरोप, थोरात म्हणाले, 'आम्ही पक्के हिंदू...'

Congress Balasaheb Thorat Replies to Shiv Sena Amol Khatal Hindutva Allegations : काँग्रेस राहुल गांधी यांनी हिंदुत्वाचा प्रचार रोखण्याचा आदेश दिल्याचा संगमनेरमधील मोर्चातील आरोपावर बाळासाहेब थोरात यांची मोठी प्रतिक्रिया दिली.
Rahul Gandhi Hindutva controversy
Rahul Gandhi Hindutva controversySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics Rahul Gandhi controversy : तथाकथित कीर्तनकार संग्रामबापू भंडारे महाराज यांच्या संगमनेरमधील कीर्तनानंतर राजकीय गोंधळ झाला. भंडारे महाराज यांनी हल्ला केल्याचा आरोप केला. यानंतर संगमनेरमध्ये राजकीय वातावरण ढवळून निघालं आणि हिंदुत्वावाद्यांनी भंडारे महाराज यांच्या समर्थनात काल मोर्चा काढला.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं. या मोर्चात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंदुत्वाचा प्रचार रोखण्याचा आदेश दिल्याचा आरोप केला. यावर बाळासाहेब थोरात यांनी, 'आम्ही पक्के हिंदू आहोत. आम्ही पक्के वारकरी संप्रदायाचे आहोत. आम्ही भागवत धर्म मानणारे आहोत', असा खणखणीत सत्ताधारी विरोधकांना सुनावले.

संग्रामबापू भंडारे महाराज यांच्या कीर्तनात गोंधळ झाला. यानंतर कीर्तन सोडून भंडारे महाराज निघून गेले. बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचा आरोप हिंदुत्वावादी (Hindu) संघटनांसह आमदार अमोल खताळ यांनी केला. भंडारे महाराज यांच्या समर्थनात मोर्चा देखील काढला. या मोर्चात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंदुत्वाचा प्रचार रोखण्याचा आदेश दिल्याचा आरोप केला. त्यावर बाळासाहेब थोरातांनी सत्ताधारी विरोधकांना खणखणीत सुनावलं आहे.

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले, "आम्ही वारकरी संप्रदायमधील, भागवत धर्मातले आम्ही आहोत. आमच्या पिढ्यान्-पिढ्या, वारकरी संप्रदायमध्ये राहिल्या आहेत. आपल्या संगमनेर तालुक्यातील प्रत्येक हरिनाम सप्ताहमध्ये आम्ही सहभागी असतो. तालुक्यातल्या सर्वात मोठ्या गंगागिरी महाराजांच्या कीर्तन सोहळ्यात आम्ही असतो. पाच ते सात वेळा आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे."

Rahul Gandhi Hindutva controversy
Sangrambapu Bhandare controversy : तथाकथित महाराजांचा बुरखा फाडलाच, खताळांची बौद्धिक पातळीही सांगितली; बाळासाहेब थोरातांचा 'जबरा' प्रतिहल्ला

...त्यांचं द्वेषाचं राजकारण!

'वारकरी संप्रदायातून आम्ही वेगळं निघू शकत नाही. वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाशी आम्ही निगडीत आहोत. आम्ही पक्के हिंदू आहोत, आम्ही पक्के वारकरी संप्रदायाचे आहोत. आम्ही भागवत धर्म मानणारे आहोत. फक्त त्यांच्या दृष्टीने आम्ही कुणाचा द्वेष करत नाही. आम्ही मानवधर्म मानतो. कुणी चुकला, तर शिक्षा झाली पाहिजे. पण त्यात मानवधर्म मोठा आहे. त्यांचे द्वेषाचं राजकारण सुरू आहे, सत्तेसाठी चाललेला खेळ आहे. देश बंधू-भावानं पुढं जावा, यासाठी प्रयत्न करतो आहेत', असे ठामपणे थोरातांनी सांगितले.

Rahul Gandhi Hindutva controversy
Dada Bhuse : आम्ही मुख्यमंत्र्यांचा आदेश पाळला, दादा भुसेंनी कुणाला चिमटा काढला?

निवडणुका जवळ आल्या, संगमनेरपासून सुरवात

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन, हिंदू-मुस्लिम वाद पेटवण्याचा प्रयत्न होतो आहे का? यावर थोरातांनी, 'विधानसभा निडवणुकीपूर्वी, असे प्रयोग झाले आहेत. दंगली केल्या की आयते मत साकाळता येतात, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे असं वातावरण निर्माण केलं जातं. विधानसभेत असे वातावरण निर्माण करून, आरोप केले गेले. पुढं काय झालं, त्याचा तपास नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झालेली आहे. त्याची सुरूवात संगमनेरपासून झालेली दिसते.'

गृहमंत्र्यांनी लक्ष घालावं, बलिदानाला तयार...

गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांचं लक्ष वेधणार का? यावर "माध्यमांनी त्यांच्या माध्यमातून दाखवले आहे. गृहमंत्र्यांपर्यंत आपोआप पोचत आहे. बंधूभावाचं, शांततेचं राज्य हवे असेल, प्रगतीचं राज्य हवे असेल तर, अशा प्रवृत्तीच्या बंदोबस्ताची तयारी त्यांना करावी लागणार आहे. कायदेशीर कारवाई यांच्यावर काय करायची? मी बलिदान द्यायला तयार आहे. खऱ्या वारकरी संप्रदायासाठी, तत्वासाठी बलिदानाची तयारी आहे," असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com