अवकाळी पावसाने नुकसानग्रस्तांचे तात्काळ पंचनामे करा

नाशिक जिल्ह्यात कांदा, द्राक्ष, गहू, हरभरा, मका, डाळींबाचे अतोनात नुकसान झाले आहे.
Karan Gaikar
Karan GaikarSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : जिल्ह्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचे तातडीने पंचनामे करून या शेतकऱ्यांना तात्काळ प्रती हेक्टरी मदत जाहीर करावी, अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेचे (Chhava Krantiveer sena) संस्थापक, अध्यक्ष करण गायकर (Karan Gaikar) यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

Karan Gaikar
देवेंद्र फडणवीस शिवसेनेवर संतापले, म्हणाले, `त्यांना लाज वाटली पाहिजे`

नाशिक जिल्ह्यात कांदा, द्राक्ष, गहू, हरभरा, मका, डाळींब यासह इतर फळभाज्या व पालेभाज्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. बेमोसमी व गारपीट सदृश्य पडलेल्या पावसामुळे लागवड झालेल्या लाल पोळ कांद्यासह टाकलेल्या उन्हाळ कांद्याच्या रोपांना फटका बसला आहे. लाल कांदा हा जमिनीत सडू लागला आहे. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या समोर अनेक संकटे उभी ठाकली आहेत. हातातोंडाशी आलेली पिके जातात की काय? या भीतीने शेतकरी रात्रंदिवस शेतeमध्ये मेहनत करत आहे. अशा परिस्थितीत निसर्गाचा कोप झाला आहे.

Karan Gaikar
मधुकर पिचड अडचणीत, मुलाला आत्महत्येस प्रवृत्त करून मालमत्ता हडप केल्याची तक्रार!

श्री. गायकर म्हणाले, शेतीपूरक जोडधंदा असलेल्या शेळ्या-मेंढ्या व दुग्धजन्य जनावरेही या अवकाळी पावसाने व थंडीने दगावली आहे. तरी यासर्व नुकसान झालेल्या गोष्टींची तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी. सद्यस्थितीत पिकांना रोगापासून वाचविण्यासाठी औषधे फवारणी करण्यासाठी लागणारी वीज देखील पूर्णवेळ मिळत नाही. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे विजेचा सतत लपंडाव सुरू झाल्याने शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे हा अन्याय तात्काळ थांबवावा.

गतवर्षी देखील परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे झाले होते परंतु त्याबदल्यात तुटपुंजी मदत देखील मिळालेली नाही. त्यामुळे शासनाने यात तातडीने लक्ष घालावे, अन्यथा शेतकर्यांना आत्महत्या केल्या शिवाय पर्याय उरणार नाही. महावितरणने सुरू केलेली सक्तीची वीजबील वसुली तात्काळ थांबवावी.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com