जळगाव : ठेवीदारांच्या (Depositer) ठेवी परत करण्यासाठी राज्य सरकार (Maharashtra) लवकच ‘पॅकेज’ मंजूर करणार आहे, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री (Cooperative Meeting) अतुल सावे (Atul Save) यांनी दिली. आमदार सुरेश भोळे (Suresh Bhole) यांनी त्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील ठेवीदारांच्या प्रश्नांची माहिती दिली. (BJP leader Suresh Bhole meets Cooperative minister in Mumbai)
जळगाव जिल्ह्यातील ठेवीदारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार सुरेश भोळे यांनी सहकारमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी जिल्ह्यातील प्रश्नांची माहिती दिली.
जळगाव जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांचा प्रश्न गंभीर असून, २००७ पासून ठेवीदारांना न्याय मिळालेला नाही. संस्थांच्या वसुली होत असूनही ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत दिल्या जात नसल्याने त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात आपण अनेकवेळा पाठपुरावा करीत असल्याची माहितीही आमदार भोळे यांनी दिली.
सहकारमंत्री अतुल सावे यांनी ठेवीदारांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण तत्पर असून, लवकरच ठेवीदारांच्या मागण्यांवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यासाठी पॅकेज मंजूर केला जाईल व ठेवीदारांना त्यांच्या रक्कमा परत दिल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. मंत्र्यांच्या या आश्वासनामुळे ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे. आपण ठेवीदारांसाठी कायम पाठपुरावा करत आहोत, अशी ग्वाहीही आमदार भोळे यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.