नाशिक : वंचित बहुजन आघाडी (Vanchik Bahujan Aghadi) सत्तेत आल्यास २००५ नंतर शासकीय सेवेत (Maharashtra) लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करू, असे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक अंजनेरी (Nashik) परिसरात पार पडली त्यात हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (Adv. Prakash Ambedkar take two days party working committy meeting)
दोन दिवसांच्या बैठकीत संघटन बांधणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच अन्य निवडणुकांत पक्षाचे धोरण काय असेल, तसेच युतीबाबत चर्चा झाली.
या बैठकीत प्रत्येक सदस्यांनी मते मांडली. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत राजकीय मुद्द्यांवर आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अन्य निवडणुका कोणत्या मुद्द्यांवर लढवाव्यात, तिकीट वाटपासाठी कोणते निकष ठरवावे या विषयांवर मुद्देसूद चर्चा होऊन त्याबाबतचे विविध ठराव बैठकीत संमत झाले.
नाशिककडे विशेष लक्ष
ॲड. आंबेडकर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकला दिलेली धावती भेट आणि आता पुन्हा राज्य कार्यकारिणीच्या निमित्ताने नाशिकला त्यांचे झालेले आगमन आणि दोन दिवस त्यांनी ठोकलेला मुक्काम यामुळे वंचित बहुजन आघाडीने नाशिककडे विशेष लक्ष केंद्रित केल्याचे कटाक्षणाने निदर्शनास येत असल्याने अन्य पक्षांच्या उरात धडकी भरू लागली आहे. त्यातच बाळासाहेब आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एका कार्यक्रमानिमित्त एकाच मंचावर आल्याने नवे राजकीय समीकरण येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
या बैठकीस प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष किसन चव्हाण, धैर्यवर्धन पुंडकर, नागोराव पांचाळ, दिशा पिंकी शेख, सोमनाथ साळुंखे, गोविंद दळवी, अनिल जाधव, सर्वजित बनसोडे, सिद्धार्थ मोकळे, प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद, प्रियदर्शी तेलंग तसेच निमंत्रित सदस्य अशोक सोनोने, कुशल मेश्राम, विष्णू जाधव, महिला आघाडी महासचिव अरुंधती शिरसाट आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.