Ambadas Danve News; पोणलोट योजनेचा एक टक्काही निधी खर्च झाला नाही!

अंबादास दानवे यांनी नियम 260 अंतर्गत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत प्रस्ताव दिला.
Ambadas Danve
Ambadas DanveSarkarnama

मुंबई : (Mumbai) राज्य सरकारचे (Maharashtra Govdernment) काम प्रजेच्या सुख दुःखात सहभागी होणे असते. मात्र कृषीमंत्र्यांना त्याबाबत अजिबात देणे घेणे नाही अशी स्थिती आहे. या सरकारने शेतकऱ्यांसाठी (Farmers) घोषणा केल्या मात्र कृती नाही. पाणलोट क्षेत्र (Watershed Programme) विकासासाठी केंद्र सरकारने भरपूर निधी दिला, मात्र राज्य सरकारने त्यातील एक टक्काही खर्च केला नाही. सर्व निधी परत पाठवला, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला. (State Government didn`t spend a one percent fund of watershed scheme)

Ambadas Danve
Dindori Loksabha; राज्यमंत्री भारती पवार यांना `कसबा` पॅटर्नचे आव्हान?

नियम 260 अन्वये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत ही चर्चा उपस्थित केली. त्यावर विविध सदस्यांनी भाग घेतला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर यावेळी सभागृहाचे लक्ष वेधले.

Ambadas Danve
Cantonment Election: देवळालीच्या निवडणुकीत भाजप विरोधात कसबा पॅटर्न!

श्री. दानवे म्हणाले, राजाचे काम प्रजेच्या सुख दुःखात सहभागी होने असते. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांत लक्ष घातले पाहिजे. आपला देश कृषीप्रधान आहे. मात्र आपण शेतीकडे काय दृष्टीकोणातून बघतो. किती लक्ष देतो. आजची सत्ताधारी पक्षाची स्थिती शेतकऱ्यांबाबत केवळ घोषणा करणे अशी आहे. शेतीला कर्ज, पिकविमा, शेतमालाचे भाव, कांदा प्रश्न, अवकाळी पाऊस, नुकसानीचे पंचनामे, शेतकऱ्यांना मदत या सर्व प्रश्नांची स्थिती चांगली नाही.

ते म्हणाले, आज शेतकऱ्यांची स्थिती आई जेऊ घालीना, बाप भिक मागु देईना अशी झाली आहे. याची अनेक उदाहरणे देता येतील. केंद्र शासनाने पंतप्रधान पाणलोट क्षेत्र विकास योजनेसाठी राज्य शासनाला भरपुर निधी दिली. मात्र प्रशासन एव्हढे उदासीन आहे की, यातील एक टक्का निधीही खर्च झालेला नाही.

Ambadas Danve
NCP News; भाजपवासी अमृता पवार यांनी राष्ट्रवादीला निष्ठा शिकवू नये!

केंद्र शासनाने पाठविलेला सर्व निधी राज्य शासनाकडून परत गेला आहे. हा निधी खर्च झाला पाहिजे होता. शेतकऱ्यांची याबाबत मागणी आहे. प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांनी सर्व निधी खर्च केला. अधिकचा निधी मागीतला. मग आपल्याला ते का शक्य झाले नाही. ही नामुष्की आहे. `निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतीमान` हे फक्त घोषणे पुरतेच आहे.

Ambadas Danve
Ncp News : भाजप आमदाराचे 'लाड' पुरवले, राष्ट्रवादीकडून भ्रष्टाचाराचे आरोप!

राज्यात पिक विमा योजनेची अंमलबजावणी पुरेशी होत नाही. आपण एक रुपया देऊन शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन अर्थसंकल्पात केले आहे. मात्र या कंपन्यांचे भरपाई देण्याचे प्रमाण व वास्तविक स्थिती काय आहे. एक हजार रुपयांपेक्षा कमी विमा भरपाई रक्कम देऊ नये असे निकष आहेत. मात्र काही शेतकऱ्यांना 65 रुपये भरपाई दिली आहे. पंचनामे व पाहणी वेळेत होत नाही. शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत. रिजेक्शनचे प्रमाण भरपुर आहे. याबाबत दहा दिवसांत भरपाई मिळेल अशी व्यवस्था व्हावी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com