मुंबईमध्ये उभे राहणार सर्व समुदायासाठी सर्वात मोठे वसतिगृह!

मातोश्री मुलींच्या वसतिगृहाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.
Ajit Pawar, Dy. C. M.
Ajit Pawar, Dy. C. M. Sarkarnama

नाशिक : वांद्रे (Mumbai) येथील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या तीन एकर जागेत सर्व समुदायांसाठी राज्यातील सर्वात मोठे वसतिगृह (Hostel) मुंबईत उभारणार आहे. या वसतिगृहात सारथी, महाज्योती व आर्थिक दुर्बल घटक व सर्व जाती, धर्माच्या समुदायातील मुला-मुलींना प्रवेश दिला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.

Ajit Pawar, Dy. C. M.
`एसटी`ची गाडी आली रुळावर...प्रवासी मात्र बांधावर!

आज उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष योजनेतंर्गत निर्माण करण्यात आलेल्या मातोश्री मुलींचे वसतिगृह लोकार्पण सोहळाप्रसंगी ते बोलत होते.

Ajit Pawar, Dy. C. M.
भ्रष्टाचार करुन मान शरमेने खाली जाईल असे वागू नका!

उपमुख्यमंत्री म्हणाले, सुरुवातीच्या काळात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी वसतिगृहे निर्माण केली व शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी खुली केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहरात आणून त्यांची वसतिगृहात राहण्याची सोय करणे, उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना परदेशी पाठविण्यासाठी मदत करणे हा विचार त्याकाळात शाहू महाराजांनी केला. महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सुद्धा शिक्षण क्षेत्रात मोलाचे आहे. आजच्या काळात शिक्षणाचे चित्र बदलले असून शिक्षणाची साधने सुद्धा अधिक प्रगत झाली आहेत. आपल्या संविधानाने आपल्याला सर्वधर्म समभाव ही शिकवण दिली आहे. देशात वेगवेगळ्या जाती, धर्म व पंथ जरी असले तरी सर्वांना एकमेकांचा आदर करण्याची शिकवण आपणास शिवाजी महाराजांनी दिली व त्याच मार्गाने फुले, शाहू व आंबेडकर यांनी सर्वांना पुढे नेले.

ते पुढे म्हणाले, आजही सर्वांना याच विचाराशिवाय तरणोपाय नाही, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, आज मातोश्री मुलींचे वसतिगृहाचे लोकार्पण झाले असून या वसतिगृहात वास्तव्यास येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीप्रमाणे शिक्षण घ्यावे. उच्च शिक्षणाची कास धरून आपले भवितव्य, पालकांचे व देशांचे नाव उज्वल करावे. आपण सर्व भारतीय आहोत ही गोष्ट लक्षात घेवून विद्यार्थ्यांनी एकत्र शिक्षण घेवून एकोप्याची भावना मनात बाळगून प्रत्येकाची उन्नती साधावी.

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार नरेंद्र दराडे, मोहम्मद इस्माईल, माजी आमदार अनिल कदम, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे, सारथीचे वरिष्ठ प्रकल्प संचालक डी. डी. देशमुख आदी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com