Sudhakar Badgujar News: महाराष्ट्रातील प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचतेय

Shivsena UBT Politics : येत्या काही दिवसात या विषयावरून हाय वोल्टेज ड्रामा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना ही कारवाई झाल्याने ती नागरिकांत चर्चेचा विषय ठरला आहे.
Sudhakar Badgujar
Sudhakar BadgujarSarkarnama
Published on
Updated on

Nashik Constituency 2024: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना नाशिक पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली आहे. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत ही कारवाई झाल्याने पोलिसांवर टीका होत आहे.

शिवसेना नेते बडगुजर यांना आज सकाळी शहर पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली. सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी ही नोटीस स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पोलिस आणि शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटात येत्या काही दिवसात या विषयावरून हाय वोल्टेज ड्रामा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) प्रचार सुरू असताना ही कारवाई झाल्याने ती नागरिकांत चर्चेचा विषय ठरला आहे.

नाशिक शहराच्या राजकारणात शिवसेनेचा शिंदे गटाकडून माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांना सातत्याने लक्ष करण्यात येत आहे. बडगुजर यांनी नाशिक महापालिकेतील कर्मचारी संघटना आणि अन्य नगरसेवकांना ठाकरे गटाशी संलग्न ठेवण्यात मोठी भूमिका पार पाडलेली आहे. या रागातून शिंदे गटाने त्यांच्या मागे शासकीय यंत्रणांचा ससेमीरा लावल्याची टीका केली जाते. त्यामुळे पोलिसांची ही कारवाई चर्चेचा विषय असून त्याला कायदेशीर उत्तर देण्याची तयारी ठाकरे गटाने केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sudhakar Badgujar
Dr. Amol Kolhe On Shivajirao Aadhalrao Patil : मला महागद्दार म्हणाला होतात, तर तुम्ही केलेली गद्दारी कोणती ? कोल्हेंनी आढळरावांना डिवचले

दरम्यान, शिवसेना ठाकरे (ShivsenaUBT) गटाचे बडगुजर अडचणीत आले आहेत. यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉक्टर डी. एल. कराड त्यांच्या मदतीला धावून आले आहेत. या संदर्भात डॉक्टर कराड यांनी पोलिसांच्या कारवाईचा चांगलाच समाचार घेतला आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना अशा प्रकारे जिल्हा पदाधिकाऱ्यांवर हद्दपारची नोटीस बजावणी, हे त्या राजकीय पक्षावर आणि कार्यकर्त्यांवर अन्याय करणारे आहे. हा लोकशाही वरा हल्ला झाला आहे असेही डॉ कराड म्हणाले.

नाशिक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) आणि शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्यात चुरशीची लढत आहे. दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रचार सुरू आहे. या संदर्भात नुकतेच टाकळी गटाचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्या पदाधिकाऱ्यांचे स्वागतासाठी मुख्यमंत्र्यांचा दौरा झाला. या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे आणि पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यासह करंजकर यांनी बडगुजर यांच्यावर टीका केली होती. यापूर्वी देखील पालकमंत्री भुसे यांनी वेळोवेळी बडगुजर यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. या संदर्भात दोन प्रकरणात पोलिस यंत्रणा त्यांचा तपास करीत आहे. याचे निमित्त करून शिंदे गटाने आपले राजकारण पुढे रेटण्याचा प्रयत्न केला आहे.

Sudhakar Badgujar
Sanjay Raut News : आश्रयदाते उद्योजकांवर हल्ला म्हणजे, मोदींचा पराभव; खासदार संजय राऊत यांचा दावा !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com