Ganesh Sugar Factory: गणेश कारखान्याच्या अध्यक्षपदी सुधीर लहारे तर उपाध्यक्षपदी दंडवते

Ganesh Sugar Factory Election: 'गणेश' कारखान्याच्या निवडणुकीत विखे विरूद्ध थोरात-कोल्हे असा सामना रंगला होता.
Ganesh Sugar Factory
Ganesh Sugar FactorySarkarnama

Ahmednagar News: गणेश सहकारी साखर कारखान्यान्याच्या निवडणुकीत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना मोठा धक्का देत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि युवा नेते विवेक कोल्हे यांच्या पॅनलने 19 पैकी 18 जागा जिंकून दिमाखदार विजय संपादन केला होता. त्यानंतर आज गणेश कारखान्याच्या अध्यक्षपदी सुधीर वसंतराव लहारे तर उपाध्यक्षपदी विजय भानुदास दंडवते यांची बिनविरोध निवड झाली आहे.

गणेश कारखान्यान्याच्या निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले होते. या निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनलविरोधात बाळासाहेब थोरात आणि विवेक कोल्हे यांच्या पॅनलचे आव्हान होते. गणेश कारखान्यान्याच्या निवडणुकीत बडे नेते उतरल्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

Ganesh Sugar Factory
Ganesh Sugar Factory Result : थोरात-कोल्हेंची होमग्राऊंडवरच विखे पाटलांना धोबीपछाड; 'गणेश'वर एकहाती सत्ता

अखेर गणेश कारखान्यावर गेल्या आठ वर्षांपासून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची असलेली सत्ता थोरात-कोल्हे यांच्या गटाने हिसकावून घेत विखे पाटलांना मोठा धक्का दिला. त्यानंतर आज (दि.28 जून ) गणेश कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची बिनविरोध निवड पार पडली.

बुधवारी दुपारी 12 वाजता पीठासीन अधिकारी माणिक आहेर यांच्या अध्यक्षतेखाली गणेश कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सुधीर वसंतराव लहारे आणि विजय भानुदास दंडवते यांची अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

Ganesh Sugar Factory
Ganesh Sugar Factory Result : विखे पाटलांना होमग्राउंडवर धक्का; थोरात-कोल्हे पॅनलची विजयाकडे घोडदौड

दरम्यान, या निवडीवेळी बाळासाहेब थोरात, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यासह आदी उपस्थित होते. या निवडीनंतर बाळासाहेब थोरात आणि स्नेहलता कोल्हे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करत त्यांना कारखान्याचा नावलौकिक वाढवा, असं म्हणत शुभेच्छा दिल्या.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com