Sudhir Mungantivar Politics: सुधीर मुनगंटीवार का म्हणाले, ‘मंत्रीपदापासून लांबच बरे’

Sudhir Mungantiwar; Mungantiwar's taunt: Should I address it to Agriculture Minister Manikrao Kokate or directly to the state government?-माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिपदाबाबत केले सूचक विधान
Manikrao Kokate & Sudhir Mungantiwar
Manikrao Kokate & Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Sudhir Mungantiwar News: भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेत आहे. यापुर्वीच्या मंत्रीमंडळात एक प्रभावी कामगिरी केली असूनही ते मंत्रिमंडळात नाहीत. त्यामुळे हा सबंध राज्यात मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यापासून चर्चेचा विषय राहिला आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी गेले काही दिवस सामान्य नागरिक आणि विविध प्रश्नांवर विधिमंडळात आक्रमक भूमिका घेतली आहे. बऱ्याचदा त्यांनी राज्य शासनालाही अडचणीचे ठरणारे प्रश्न केले आहेत. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार मंत्रिमंडळात जाण्यासाठी उत्सुक तर नाहीत ना? अशी चर्चा सतत होत आली आहे.

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे नाशिकचे होते. मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून ते सातत्याने वादग्रस्त वक्तव्य केल्याने चर्चेत राहिले. गेल्या अधिवेशनात कोकाटे यांच्यावरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरले होते. अखेर श्री. कोकाटे यांचे खाते बदलण्यात आले.

Manikrao Kokate & Sudhir Mungantiwar
Chhagan Bhujbal : राज-उद्धव ठाकरे युतीवर छगन भुजबळ यांच्या सुचक इशाऱ्याने नवा अँगल?

माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी त्रंबकेश्वर येथे ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांची संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मुक्तपणे आपली मते मांडली. यावेळी मला मंत्रिपद मिळावे म्हणून देवदर्शनासाठी आलेलो नाही. मी एक साधक आहे. त्यामुळेच त्र्यंबकेश्वरला जाऊन दर्शन घेतले.

या पार्श्वभूमीवर नाशिक येथे माजी मंत्री मुनगंटीवार यांनी पत्रकार आणि राज्य शासन दोघांनाही चिमटा घेतला आहे. मी मंत्री झालो आणि चुकून काही वादग्रस्त बोललो तर चार-पाच दिवस सलग मीच टीव्हीवर दिसणार. त्यामुळे मी आहे तिथेच बरा आहे.

हा संदर्भ ताजा असताना माजी मंत्री मुनगंटीवार यांनी वरील विधान केले आहे. त्यामुळे एक प्रकारे हा माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना चिमटा आहे. त्याचबरोबर राज्य शासनालाही दिवसण्याचा मुनगंटीवार यांचा हेतू तर नसावा असा दुहेरी अर्थ त्यांच्या विधानातून जाणवतो आहे. त्यामुळे राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com