Chhagan Bhujbal : राज-उद्धव ठाकरे युतीवर छगन भुजबळ यांच्या सुचक इशाऱ्याने नवा अँगल?

Chhagan Bhujbal statement on Raj-Uddhav unity: शिवसेना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या मनसेच्या समर्थकांमध्ये मुंबई बाहेर एकमत अवघड?
Chhagan Bhujbal, Uddhav Thackeray & Raj Thackeray
Chhagan Bhujbal, Uddhav Thackeray & Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal's Role in Maharashtra Politics: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र येणार हे जवळपास नक्की झाले आहे. त्या दृष्टीने राज ठाकरे यांनी थेट विधान केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत मनोमिलन घडविण्यासाठी प्रयत्न होत आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र येणार आहे. ही राजकीय युती महाविकास आघाडीला क्षीण करण्याचा भाजपचा डाव उलटवणारी आहे. त्यामुळे या युतीबाबत भाजप नेते सातत्याने विविध विधाने करून वातावरण वळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र होते.

यामध्ये आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही एक वेगळेच विधान केले आहे. त्यांच्या विधानात तथ्य आढळल्यास मुंबई वगळता राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये जागा वाटपावरून धमासन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांनी या विधानाकडे गांभीर्याने पाहिले आहे.

Chhagan Bhujbal, Uddhav Thackeray & Raj Thackeray
Chhagan Bhujbal : धनंजय मुंडेंना बंगल्याबाहेर कसं काढणार? भुजबळांना पडला प्रश्न

श्री भुजबळ म्हणाले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही एकत्र येत आहेत. राजकीयदृष्ट्या कोणी कोणाबरोबर जावे हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय असतो. त्याप्रमाणे शिवसेना आणि मनसे एकत्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ठाकरे बंधू एकत्र आल्याने वेगळे चित्र निर्माण होऊ शकते.

श्री भुजबळ यांनी, मनसे आणि शिवसेना एकत्र आल्यास मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांचे नेते आणि समर्थक एकत्रीतपणे काम करू शकतील, परंतु मुंबई बाहेर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जागा वाटपावरून एकमत पुण्यात अडथळे येऊ शकतात.

काम करताना अनेकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागावाटप करताना मनसे आणि शिवसेना पक्षाच्या इच्छुकांमध्ये स्थानिक पातळीवर मतभेद निर्माण होऊ शकतात. गरजेनुसार काही वेगळे निर्णय देखील यातून होतील.

शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसे यांच्यात मतभेदाचा अध्याय सुरू होऊ शकतो. त्याचप्रमाणे महायुतीमध्ये देखील अशीच स्थिती आहे. भाजपच्या नेत्यांनी याबाबत जाहीरपणे वक्तव्य केले आहे.

जिथे एकमत होऊ शकणार नाही, तिथे स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतले जाणार आहे. त्यामुळे एकाच जागेवर अनेक इच्छुक अपेक्षा ठेवून असल्याने ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबई बाहेर अडचणी निर्माण होण्याचा संभाव्य धोका मंत्री भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com