Pravara Sugar Factory News : मंत्री विखेंच्या प्रवरा साखर कारखान्याला भीषण आग; मोठा अनर्थ टळला

Sugar Factory News : अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा साखर कारखान्याच्या वीजनिर्मिती प्रकल्पाला भीषण आग लागली आहे. सतर्कता दाखवत कामगार बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
Sugar Factory News
Sugar Factory News Sarkarnama

Nagar News : अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा साखर कारखान्याच्या वीजनिर्मिती प्रकल्पाला भीषण आग लागली आहे. सतर्कता दाखवत कामगार बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून, आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सध्या हा कारखाना राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishn vikhe) यांच्या अधिपत्याखाली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. घटनेची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या आहेत. (Pravara Sugar Factory News)

Sugar Factory News
Raosaheb Danve News : रावसाहेब दानवेच राजकारणातले खरे हिरो नंबर वन...

प्रवरा साखर कारखान्यात वीजनिर्मितीचा हा प्रकल्प गॅमन इंडिया या खासगी कंपनीचा आहे. उन्हाळ्यात आग लागल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. सुदैवाने कामगार बाहेर पडल्याने अनर्थ टळला. जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या आगीमुळे कारखान्यातील सर्व कामकाज बंद करण्यात आले असल्याचे समजते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

प्रवरा साखर कारखान्याच्या वीजनिर्मिती प्रकल्पाला आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून, आग आटोक्यात आणण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आग लागल्याची चाहूल लागताच कर्मचारी सतर्कता दाखवत बाहेर आले. या लागलेल्या आगीत कारखानास्थळी मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

प्रवरा साखर कारखाना सध्या राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली आहे. पोलिस यंत्रणाही घटनस्थळी पोहाेचली असून, आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.

R

Sugar Factory News
Sugar Factory News : 'गाळपा'पूर्वीच साखर सम्राटांना दणका; तब्बल ४५ साखर कारखाने बंद करण्याचे केंद्राचे निर्देश!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com