Jalna Loksabha Constituency : राजकारणी आणि चित्रपट सृष्टी याचा कायम ऐकमेकांशी जवळचा संबंध राहिला आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन, गोविंदा, धर्मेंद्र, हेमा मालिनी, रेखा, सनी देओल, रवि किशन, दिवंगत राजेश खन्ना यांच्यासह अनेक कलाकारांनी आपल्या आयुष्याची दुसरी इंनिग ही राजकारणात सुरू केली. यापैकीच एक असलेले सिने अभिनेता गोविंदा Govinda (आहुजा) यांनी काही वर्षांपूर्वी मुंबईतून लोकसभा निवडणूक Loksabha Election लढवली होती. ते 2004 ते 2009 दरम्यान खासदार होते.
पण नंतर ते या क्षेत्रापासून दूर गेले होते. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्याशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध आणि त्यांच्या आग्रहाखातर गोविंदा यांनी नुकताच शिवसेनेत Shivsena प्रवेश केला होता. लोकसभा निवडणूक जाहीर झालेली असल्यामुळे गोविंदासारख्या प्रसिद्ध चेहऱ्याचा उपयोग प्रचारासाठी करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर मराठवाडा, विदर्भ व राज्याच्या अनेक भागात महायुतीच्या प्रचाराची जबाबदारी सोपवली.
बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव Prataprao Jadhav यांच्या प्रचारासाठी गोविंदा नुकतेच आले होते. या वेळी त्यांची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे Raosaheb Danve यांच्याशी भेट झाली. रावसाहेब दानवे यांचे भाषण, ग्रामीण शैली आणि उपस्थितांना खिळवून ठेवण्याची स्टाइल पाहून अभिनेता गोविंदा भारावून गेले. जेव्हा भाषण करायची संधी मिळाली तेव्हा रावसाहेब दानवे हेच राजकारणातले खरे हिरो नंबर वन आहेत, अशी स्तुतिसुमने गोविंदा यांनी त्यांच्यावर उधळली.
भोकरदनजवळील धाड येथील प्रचार सभेत दानवे यांनी नेहमीप्रमाणे टोलेबाजी करत भाषण केले. या वेळी गोविंदाला पाहण्यासाठी जमलेली गर्दी पाहून तुम्ही आज सगळे गोविंदा यांना पाहायला आले आहात. ते जरी चित्रपट अभिनेते असले तरी 2004 मध्ये माझ्यासोबत संसदेत खासदार म्हणून काम करत होते. जयाप्रदा, जया बच्चन, हेमा मालिनी, सनी देओल अशा अनेक अभिनेत्यांसोबत मी संसदेत काम केलेले आहे.
अभिनेत्यांच्या आयुष्यामध्ये सिनेमा करत असताना रिटेक नावाचा प्रकार असतो. अभिनय करत असताना एखादी चूक घडली तर रिटेक घेता येतो आणि ती चूक दुरुस्त करता येते. मात्र राजकारणामध्ये असा रिटेक नसतो, हाच फरक आहे सिने अभिनेता आणि राजकारण्यांमधला.
नेता म्हणून जेव्हा तुम्ही वावरत असता तेव्हा जनतेच्या प्रश्नाला तुम्ही धावून गेलात आणि मतदार संघात चांगली कामगिरी केली तर ठीक, नाहीतर तुम्हाला जनता रिटेक घेण्याची संधी देत नाही, असे सांगत गोविंदा यांची फिरकी घेतली. दानवे यांच्या भाषणानंतर गोविंदा यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले. आम्ही चित्रपट अभिनेते जरी असलो तरी राजकारणातील खरे हिरो हे रावसाहेब दानवेसाहेबच आहेत, ते खरे हिरो नंबर वन असल्याचे सांगत गोविंदा यांनी त्यांना दाद दिली.
R