NCP Politics : शेतकऱ्यांचे पैसे दिले नाही, तर साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही!

Sugar Factory Politics, Nandurbar Farmers meets Guardian Minister Anil Patil-मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी शहादा साखर कारखान्याच्या थकबाकीबाबात दिला कारखानदाराला इशारा
Minister Anil Patil
Minister Anil PatilSarkarnama
Published on
Updated on

Nandurbar Farmers Politics : शहादा साखऱ कारखान्याच्या खाजगी व्यवस्थापनाने ऊस उत्पादकांचे पैसे दिर्घकाळ थकविले आहेत. शेतकऱ्यांच्या या प्रश्नाविषयी पालकमंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सहकार मंत्र्यांकडे गाऱ्हाने केले आहे. (Shahada Sugar Factory delayed payments of Sugar Growers from long Time)

शहादा (नंदुरबार) (Nandurbar) साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांच्या (Farmers) समस्यांबाबत पालकमंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांना शेतकऱ्यांनी अवगत केले. मुख्यमंत्र्यांकडे (Eknath Shinde) याविषयी तक्रार करण्यात आली आहे.

Minister Anil Patil
Maharashtra Politics : राधाकृष्ण विखे यांनी बाळासाहेब थोरात यांना चांगलेच सुनावले!

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा साखर कारखान्याकडे अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे थकल्याने ते संकटात असून, या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहेच, आपणही पालकमंत्री या नात्याने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, अशा सूचना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी पावकमंत्री पाटील यांना केली आहे.

शहादा साखर कारखाना चालविणाऱ्या व्यवस्थापनाकडून असंख्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे गेल्या आठ ते दहा महिन्यापासून पैसे थकवले आहेत. अनेकदा मागणी तसेच आंदोलन करून देखील कारखाना मालक पैसे देण्यास धजावत नाही.

या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी बाधित शेतकऱ्यांसह आंदोलन केले होते. त्यानंतर देखील साखर कारखान्याच्या खाजगी व्यवस्थापनानेत्याला दाद दिलेली नाही. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कायदा गुंडाळून ठेवला आहे. शेतकऱ्यांना न्याय काही मिळालेला नाही.

Minister Anil Patil
Maratha Reservation : ‘भुजबळ साहेब, तुमचे घर काचेचे आहे, हे विसरू नका’

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हा विषय गांभीर्याने घेत सरकार शंभर टक्के त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले आणि आपण शेतकऱ्यांना धीर देत त्यांच्या सोबत राहावे, अशा सूचनाही दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कारखाना मालकाने लवकर शेतकऱ्यांचे पैसे न दिल्यास त्यांच्यावर निश्चितपणे गुन्हे दाखल होणार, असा स्पष्ट इशारा अनिल पाटील यांनी दिला. जोपर्यंत शेतकऱ्यांची पै न पै मिळत नाही, तोपर्यंत कारखाना सुरू करण्यास परवानगी देण्यात येऊ नये, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

Minister Anil Patil
Maharashtra BJP Politics : मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी मी दोन तास त्याची प्रॅक्टिस केली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com