Maharashtra BJP Politics : मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी मी दोन तास त्याची प्रॅक्टिस केली

BJP Minister share her story, I could not believe thet i would became minister-केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार मैत्रिणीच्या घरी जुन्या आठवणींत रमल्या
Dr. Bharti Pawar
Dr. Bharti PawarSarkarnama
Published on
Updated on

दिलीप वैद्य

Dr. Bharti Pawar News : मी पंतप्रधान कार्यालयात कोरोनासंदर्भातील बैठकीसाठी गेले होते. नवीन खासदार असल्याने मागच्या रांगेत बसले होते. या वेळी राज्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचे पत्र मला देण्यात आले. त्यावर विश्वासच बसेना. मी ते पत्र वारंवार वाचले. पतीलाही वाचायला दिले, असे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या. ( Dr. Bharti Pawar share her political experience With medical classmate)

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) सध्या मध्य प्रदेश निवडणुकीत बऱ्हाणपूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या (BJP) समन्वयक आहेत. येथील प्रचारानंतर त्या रावेल (जळगाव) (Jalgaon) वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधींना भेटल्या.

Dr. Bharti Pawar
Maratha Reservation: सुजात आंबेडकरदेखील म्हणाले, मी तुमच्या बरोबर!

मध्य प्रदेश निवडणुकीतील प्रचारानंतर त्यांनी आपली वैद्यकीय अभ्यासक्रमादरम्यानच्या वर्गमैत्रीण डॉ. सुचिता कुयटे यांच्या रावेर येथील निवासस्थानी सायंकाळी उशिरा भेट दिली. या वेळी शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील काही मंडळीही होती. या वेळी त्या जुन्या आठवणींत रमल्या. गप्पांमध्ये त्यांनी विविध प्रसंग सांगितले.

या वेळी त्या म्हणाल्या, कोरोना कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या एका बैठकीस मी गेले होते. तेव्हा तातडीचा दौरा म्हणून केवळ दोन साड्या नेल्या होत्या, एक साधी साडी नेसून मी बैठकीला गेले होते. पहिल्या टर्मची खासदार असल्याने मागच्या रांगेत बसले होते.

या वेळी माझ्या हातात एक पत्र देण्यात आले. त्यात मी राज्यमंत्री म्हणून शपथ घ्यायाची असल्याने नमूद केले होते. ते पत्र वाचून माझा विश्वासच बसेना. मला आश्चर्याचा धक्काच बसला. आनंदही झाला. मी ते पत्र वारंवार वाचले. नंतर पतींना वाचायला दिले, तेव्हा कुठे विश्वास बसला. मी एवढ्या लवकर मंत्री होईन असे कधीच वाटले नव्हते. तसा दिल्लीतील राजकारणाचा फारसा अनुभवदेखील नव्हता. त्यामुळे शपथविधीपूर्वी, मंत्रिपदाची शपथ कशी घ्यायची, प्रोटोकॉल काय असतात हे समजून घेत मी दोन तास शपथ घेण्याचा सराव केला, असे डॉ. पवार यांनी सांगितले.

राज्यमंत्री झाल्यावर मात्र मी आत्मविश्वासाने कामाला लागले. केंद्रीय मंत्रिमंडळात काम करताना राष्ट्रभक्ती आणि समर्पणाची भावना मनात ठेवून काम करते आहे. सध्यादेखील आरोग्यविषयक सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचे उद्दिष्ट डोळ्यांपुढे आहे, असे त्या म्हणाल्या.

Dr. Bharti Pawar
Bhujbal v/s Kande : दुष्काळ जाहीर होईल, मात्र श्रेय आमदार कांदे यांना की पंकज भुजबळांना!

त्या म्हणाल्या, दिल्लीत राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात सहभागी होण्याचं माझे सासरे (कै) ए. टी. पवार यांचे स्वप्न होते. ते आता पूर्ण झाल्याने शपथ घेतल्यावर डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीम त्यावेळी नवी होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांकडून तयारी करून घेणारे, सहकाऱ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवणारे असे आहेत. पंतप्रधान 'आमचं म्हणणं ऐकून घेतात. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणं आणि शिकायला मिळणं हे आमचे भाग्यच आहे,' असेही त्यांनी सांगितले. आरोग्य विभागाचे कॅबिनेट मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वातदेखील खूप काही शिकायला मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Dr. Bharti Pawar
Maharashtra Politics : मराठवाड्याचे पाणी अडवण्यासाठी अमृता पवारही आल्या पुढे!

काश्मीरमधले ३७० वे कलम रद्द करताना आणि महिला आरक्षणाच्या विधेयकावर केलेले मतदान या दोन्ही वेळेस मनस्वी आनंद झाल्याचे त्यांनी नमूद केले. कोरोना काळात आपल्या आरोग्य विभागाने भारतातील २२० कोटी नागरिकांना केलेले लसीकरण हे आव्हानात्मक काम असल्याचे त्या म्हणाल्या.

केंद्र सरकारने तयार केलेले कोरोनाबाबतचे संकेतस्थळ अन्य देशांनी स्वीकारले आहे. यामध्येच या विभागाचे यश आहे. आपला विभाग पूर्वी इलनेसमध्ये होता आता तो वेलनेसमध्ये काम करीत असून, आरोग्य क्षेत्रात भारत करत असलेल्या प्रगतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. डॉ. पवार बराच काळ आपल्या वैद्यकीय शिक्षणादरम्यानच्या सहकाऱ्यांसमवेत गप्पांत रमल्या. डॉ. कुयटे आणि डॉ. भगवान कुयटे यांच्या घरी झालेल्या या कौटुंबिक कार्यक्रमात त्यांनी सर्वांशी मनमोकळा संवाद साधला. केंद्रीय राज्यमंत्री असूनही त्यांचा साधेपणा उपस्थित सर्वांनाच भावला.

Dr. Bharti Pawar
Balasaheb Thorat: दिवाळीत थोरातांनी अजितदादांवर टाकला 'बॉम्ब'; मोदींच्या आरोपानंतर सगळं कसं शांत?

डॉ. पवार बराच काळ आपल्या वैद्यकीय शिक्षणादरम्यानच्या सहकाऱ्यांसमवेत गप्पांत रमल्या. डॉ. कुयटे आणि डॉ. भगवान कुयटे यांच्या घरी झालेल्या या कौटुंबिक कार्यक्रमात त्यांनी सर्वांशी मनमोकळा संवाद साधला. केंद्रीय राज्यमंत्री असूनही त्यांचा साधेपणा उपस्थित सर्वांनाच भावला.

Dr. Bharti Pawar
Maratha Reservation News : आमच्या हातात सत्ता द्या; आरक्षणाचा प्रश्न दहा मिनिटांत सोडवतो : महादेव जानकर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com