Sujat Ambedkar Politics: आश्चर्य... एकही जागा न जिंकलेले सुजात आंबेडकर म्हणतात, 'लोकसभा विधानसभेत आम्हाला चांगले यश मिळाले'

Sujat Ambedkar Claims Success Despite Not Winning a Single Seat: वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जिंकू शकला नव्हता.
Sujat Ambedkar
Sujat AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Sujat Ambedkar News: वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी काल नाशिकला मेळावा घेतला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होता. महापालिका निवडणुकीच्या तयारीला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुरुवात करावी असे यावेळी त्यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी यावेळी आगामी महापालिका निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांनी जागरूक राहून नियोजन करावे. कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे. महापालिका निवडणुकीत आपल्या पक्षाला यश मिळणे अत्यंत आवश्यक आहे, असे सांगितले.

राजकारणात सक्रिय राहायचे असेल आणि प्रभाव निर्माण करायचा असेल तर सत्ता महत्त्वाची असते. सत्तेसाठी निवडणुकीत यशस्वी होणे आवश्यक असते. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला सत्ताधारी पक्ष करण्यासाठी परिश्रम घेतले तर ते शक्य होईल.

Sujat Ambedkar
Ahmedabad plane air crash: अहमदाबाद अपघातातील विमानाचे सहवैमानिक होते नाशिकचे बाळासाहेब पाठक, कुटुंबियांना म्हणाले होते, गुड मॉर्निंग!

यावेळी सुजात आंबेडकर यांनी एक अजब विधान केले. ते म्हणाले लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले आहे. वस्तुतः लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळाली नाही. त्यांचे मतांचे प्रमाण देखील कमी झाले. नाशिक मतदारसंघात गत निवडणुकीच्या तुलनेत लोकसभेला वंचित बहुजन आघाडीच्या मतांत मोठी घट झाली.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न होता. त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र चर्चा केली होती. महाविकास आघाडीच्या बैठकांना मात्र आंबेडकर सातत्याने उपस्थित राहणे टाळत होते. बैठकांना जाण्याऐवजी त्यांनी माध्यमांतून विधाने करण्याला प्राधान्य दिले होते. शेवटपर्यंत आघाडीला झुलवत ठेवत वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र निवडणुका लढविण्याचे घोषित केले.

यामध्ये मतदारांनी मात्र या पक्षाकडे फार गांभीर्याने पाहिले नाही असे दिसत होते. बहुजन आघाडीला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार विजयी करता आला नाही. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाल्याचा सुजात आंबेडकर यांचा दावा कशाच्या आधारे? असा संभ्रम मतदारांमध्ये निर्माण होऊ शकतो.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला यश मिळाले नाही. ती उणीव भरून काढण्याचा जोरदार प्रयत्न पक्ष आणि पक्षाचे नेते आगामी महापालिका निवडणुकीत करतील असे संकेत सुजात आंबेडकर यांनी आपल्या दौऱ्यातून दिले आहेत. आता पक्ष निवडणुकीला कसा सामोरे जातो याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com