Ahmedabad air accident: एअर इंडियाच्या अहमदाबाद लंडन विमानाचा गुरुवारी अपघात झाला. हा शतकातील सर्वात मोठा विमान अपघात मांडला जातो. त्यामुळे या अपघाताची जगभर चर्चा सुरू आहे. या अपघातात महाराष्ट्रातील नऊ जणांचा समावेष आहे.
अहमदाबाद लंडन या विमानाचा काल दुपारी अहमदाबाद विमानतळा नजीकच उड्डाणानंतर लगेचच अपघात झाला. या अपघातात २४१ प्रवासी ठार झाले आहेत. हा शतकातील सर्वात मोठा अपघात असल्याने त्याची विशेष चर्चा होत आहे. या अपघातात भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री विजय रूपाने यांचा देखील मृत्यू झाला.
एअर इंडियाच्या ड्रीम लाइनर या विशेष विमानाचे वैमानिक अनुभवी सुमित सबरवाल होते. त्यांच्या क्रू मध्ये सहवैमानिक म्हणून बाळासाहेब पाठक कार्यरत होते. साहेब पाठक हे मूळचे नैताळे (निफाड) येथील आहेत. विमान अपघाताच्या बातम्या नंतर या गावात शोककळा पसरली होती.
अपघातग्रस्त झालेल्या विमानात महाराष्ट्रातील पाच प्रवासी होते. याशिवाय विमानाच्या १२ क्रू मेंबर्स पैकी चार जण महाराष्ट्रातील होते. विशेष म्हणजे यातील वैमानिक आणि सहवैमाने दोघेही सध्या बदलापूर येथे वास्तव्यास होते. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेकांनी याविषयी हळहळ व्यक्त केली आहे.
दीपक उर्फ बाळासाहेब पाठक हे सहवैमानिक यांचे शिक्षण निफाड तसेच नाशिक येथे झाले आहे. मुंबईत उच्च शिक्षण घेतल्यानंतर ते वैमानिक झाले होते. अकरा वर्षे ते एअर इंडियात सहवैमानिक म्हणून कार्यरत होते. गुरुवारी सकाळी त्यांनी आपल्या कुटुंबीयांना गुड मॉर्निंग असा मेसेज पाठवला होता. त्यात आज अहमदाबाद लंडन अशी फ्लाईट असल्याचे देखील त्यांनी म्हटले होते.
अपघाताचे वृत्त कळाल्यावर पाठक यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही. सुरुवातीला भ्रमणध्वनीवर नॉट रीचेबल असा संदेश येत होता. त्यानंतर भ्रमणध्वनीच्या रिंगचा आवाज येत होता मात्र प्रतिसाद मिळत नव्हता.
सहवैमानिक श्री पाठक हे लासलगाव येथील रेल्वे कर्मचारी सनी पाठक यांचे चुलत बंधू आहेत चार वर्षांपूर्वी त्यांचा विवाह नैताळे येथील पाटबंधारे विभागाचे कर्मचारी कारभारी जेठे यांच्या कन्याशी झाला होता. या अपघातानंतर पाठक यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली.
सहवैमानिक श्री. पाठक यांच्या भगिनी याबाबत विशेष कष्टी होत्या. त्यांनी आम्हाला कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही आम्ही देवाकडे दीपकच्या सुखरूपतेसाठी आणि त्याला दीर्घायुष्य लाभो यासाठी प्रार्थना करत आहोत. गावातील अनेक नागरिकांनी पाठक कुटुंबीयांची भेट घेऊन सहवेदना व्यक्त केल्या.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.