सुमित्रा महाजन यांनी राजकारणावर बोलणे टाळले!

मनमाड येथील कार्यक्रमात भाजप नेत्या सुमित्रा महाजन यांची उपस्थिती.
Sumitra Mahajan
Sumitra MahajanSarkarnama
Published on
Updated on

मनमाड : शाळेचे शिक्षक (Teacher) समाजात (Society) चांगले नागरिक घडवण्याचे काम करतात. ही सामाजिक जबाबदारी (Socail responsiblity) जोपासली गेली पाहिजे. सामाजिक एकोप्याचा (Unity) भाव जोपासला गेला पाहिजे. शाळेकडून आपल्याला जे संस्कार मिळाले ते समाजात पेरले पाहिजे, असे प्रतिपादन (BJP) लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन (Sumitra Mahajan) यांनी केले. (BJP leader Sumitra mahajan avoid political coments in School programme)

Sumitra Mahajan
Shocking: एसपी सचिन पाटील, मनसे नेते प्रदीप पवार यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, इंडियन हायस्कूलच्या शताब्दी महोत्सव व माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यात त्या बोलत होत्या. सुरवातीला शाळेचे संस्थापक तात्यासाहेब सप्रे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रदिर्घ काळ भाजपच्या नेत्या असलेल्या महाजन यांनी शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमात राजकारणावर भाष्य करणे टाळले.

Sumitra Mahajan
Nashik; नगरसेवक प्रवेशावरून शिंदे गट तोंडावर पडला!

श्रीमती महाजन म्हणाल्या, शाळेचे शताब्दी महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. एक संस्था, एक शाळा आणि तिचा इतिहास आज शंभर वर्षाचा झाला आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची आणि गौरवास्पद बाब आहे.

कवी अशोक नायगावकर यांनी मनमाडच्या आठवणी जागवल्या. ते म्हणाले, मी मनमाडला असताना शाळेचे संस्थापक तात्यासाहेब सप्रे यांच्या घरात राहत असे. माझी जडणघडण येथे झाली. मनमाड आणि पाणी हे माझ्या कवितेचे विषय झाले आहे. पाणीप्रश्‍नाची आठवण सांगतांना त्यांनी विहिरीवर पाणीचोरी होऊ नये, यासाठी वॉचमन ठेवल्याचे सांगितले.

आमदार सुहास कांदे म्हणाले, सुमित्रा महाजन यांचा आदरयुक्त धाक लोकसभेत बघावयास मिळाला. अहिल्यादेवी यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्यांनी कार्य केले. सर्वात जुनी आणि पहिली शाळा म्हणून इंडियन हायस्कूलकडे पाहिले जाते. शाळा शताब्दी महोत्सव साजरा करत आहे ही आपल्या मनमाडकरांसाठी अभिमान आणि आनंदाची बाब आहे.

यावेळी कवी अशोक नायगावकर, साहित्यिक मेघा सोमय्या, ज्येष्ठ संचालक डॉ. विद्याधर मालते, अरुणा सप्रे, हेमंत गवळे, प्रज्ञेश खंदाट, राजेंद्र कलाल, शाळेचे संचालक राजेंद्र गुप्ता, विकास काकडे, मुख्याध्यापक क्रांती कुंझरकर, हर्षद गद्रे, पी. बी. कुलकर्णी आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com