Suniel Shetty Marathi Hindi comment : हिंदी भाषा वादात, अभिनेता सुनील शेट्टी यांची उडी; म्हणाले, 'जन्मभूमी कर्नाटक, पण कर्मभूमी मुंबईत मराठी...'

Suniel Shetty Reacts on Marathi and Hindi Language in Mumbai During Shirdi Ahilyanagar Visit : शिर्डी इथं साईसमाधीचं दर्शन घेतल्यानंतर हिंदी आणि मराठी भाषेवर अभिनेता सुनील शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली.
Suniel Shetty Marathi Hindi comment
Suniel Shetty Marathi Hindi commentSarkarnama
Published on
Updated on

Suniel Shetty on Mumbai culture : हिंदी भाषा सक्तीवरून राज्यातील महायुती सरकारला माघार घ्यावी लागली. हिंदी भाषा संदर्भातील दोन अध्यादेश रद्द करण्यात आले. यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान सुरू आहे.

राज ठाकरेंनी या हिंदी भाषेवरून राज्य सरकारला पुन्हा इशारा दिला आहे. या मुद्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतानाच, हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुनील शेट्टी यांनी शिर्डीत या मुद्यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता सुनील शेट्टी यानं शिर्डीत (Shirdi) साईबाबा समाधीचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठी भाषेविषयी मोठं भाष्य केलं. 'माझी जन्मभूमी कर्नाटक असली, तरी कर्मभूमी मुंबई आहे. इथं राहून मला मराठी बोलता आलेच पाहिजे', अशी परखड भूमिका अभिनेता सुनील शेट्टी याने मांडली.

सध्या राज्यात हिंदी-मराठी विषयांवरून वातावरण ढवळून निघाले, असताना सुनील शेट्टी याने मराठीबाबत मांडलेली भूमिका महत्वाची म्हणावी लागेल. राज्यात हिंदी भाषेच्या सक्तीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी सर्व पक्षीय आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने साथ दिली. शिवसेना ठाकरे सेना पक्षाने राज्यभर हिंदी सक्ती कायद्याची होळी केली.

Suniel Shetty Marathi Hindi comment
Rohit Pawar Vs Ram Shinde : सभापती शिंदेंनी पुन्हा टायमिंग साधलं; आमदार पवारांना सहावा धक्का

अधिवेशनापूर्वी महायुती सरकारची कॅबिनट बैठक झाली. या बैठकीत देखील हिंदी भाषा सक्तीवरून बराच वाद झाला. यानंतर हिंदी भाषा सक्तीचा अध्यादेश माघारी घेण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन हिंदी भाषा सक्तीचे दोन्ही अध्यादेश रद्द केल्याची घोषणा केली.

Suniel Shetty Marathi Hindi comment
Top Ten News : भाजप अध्यक्षांचं नाव ठरलं, विजयी सभा होणारच, शिवसेनेत नाराजीचा स्फोट; वाचा महत्वाच्या घडामोडी...

यानंतर ठाकरे बंधूंच्या समर्थकांनी राज्यभर जल्लोष सुरू केला आहे. पाच जुलैला शिवसेना ठाकरे सेना आणि मनसेचा संयुक्त विजय मेळावा होणार आहे. तत्पूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महायुती सरकारच्या छुप्या अजेंडावर जोरदार टीका केली. आज अधिवेशनात देखील याचे पडसाद उमटले.

सत्ताधारी शिवसेनेने उद्धव ठाकरेंना टार्गेट करत आंदोलन केले. तर शिवसेना उद्धव ठाकरे सेनेच्या आमदारांनी 'मी मराठी', अशा टोप्या घालून विधानसभा भवनात प्रवेश करत आंदोलन केले. यातच अभिनेता सुनील शेट्टी यांनी मुंबईत राहून मराठी आलीचं पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिल्याने या मुद्याला अधिकच महत्त्व आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com