Sunil Tatkare News: आश्चर्य, निवडणुकीआधीच तटकरेंनी जाहीर केले दोन मंत्री!

Sunil Tatkare Politics, NCP Ajit Pawar group declares ministry before assembly Result-राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या दौऱ्यात जाहीर केली चक्क मंत्र्यांची नावे
Sunil Tatkare, Manikrao Kokate & Ashutosh Kale.jpg
Sunil Tatkare, Manikrao Kokate & Ashutosh KaleSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. या संदर्भात प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी नुकताच नाशिकचा दौरा केला. यावेळी त्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला.

प्रदेशाध्यक्ष तटकरे यांचा विधानसभा निवडणुक आढावा दौरा नुकत्याच झाला. यावेळी त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची विधानसभा मतदारसंघ निहाय राजकीय माहिती घेतली. त्यात बहुतांशी नेत्यांनी आपलाच पक्ष विजयी होणार, असा दावा केला.

नाशिक जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात या राष्पट्क्षारवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत. या जागा टिकवून ठेवणे पक्षापुढे मोठे आव्हान आहे. त्यामुळे आमदार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह वाढविण्यासाठी विविध प्रयोग केले जात आहेत.

खासदार तटकरे यांच्या दौऱ्यात त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देणार असे स्पष्ट संकेत दिले आहेत. या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे फक्त उमेदवार जाहीर न करता त्यांनी अनेक ठिकाणी संबंधित उमेदवारांना मंत्री करणार अशी घोषणाही केली आहे.

Sunil Tatkare, Manikrao Kokate & Ashutosh Kale.jpg
Jaykumar Rawal Politics: कामराज निकम यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाच्या झटक्याने भाजप अस्वस्थ?

सिन्नर विधानसभा मतदारसंघात आमदार माणिकराव कोकाटे यांना एक लाख मतांचे मताधिक्य द्यावे. तसे झाल्यास त्यांना मंत्री करू, असे आमदार कोकाटे यांच्या समर्थकांना गुदगुल्या करणारे विधान खासदार तटकरे यांनी केले. नाशिकचे छगन भुजबळ सध्या मंत्री आहेत. त्यामुळे अजित पवार गटाला मंत्रीपदे मिळणार किती? आणि ते संधी किती लोकांना देणार? हा प्रश्नच आहे.

त्याचीच पुनरावृत्ती त्यांनी शेजारच्या कोपरगाव मतदार संघातही केली. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या मतदारसंघातही खासदार तटकरे यांनी त्यांना पुन्हा विजयी केल्यास त्यांना मंत्री करू, असे थेट आश्वासनच दिले. त्यामुळे तटकरे यांच्या दौऱ्यात विधानसभेचे उमेदवार आणि निवडणुकीनंतर सत्ता आल्यास मंत्र्यांची नावे दोन्ही जाहीर होऊ लागली आहेत. त्यामुळे हा दौरा वेगळा ठरतो आहे.

नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यात त्यांनी देवळाली मतदारसंघात झालेल्या कार्यक्रमात सरोज अहिरे यांना उमेदवारी मिळणार असे जाहीर केले. दिंडोरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. या मेळाव्यात तटकरे यांनी नरहरी झिरवाळ यांच्या कामाची तोंड भरून स्तुती केली. झिरवाळ हे कार्यक्षम आमदार असल्याने तेच दिंडोरीचे उमेदवार असतील, असे त्यांनी सांगितले.

Sunil Tatkare, Manikrao Kokate & Ashutosh Kale.jpg
Mahayuti Politics: नाशिकचा आयुक्त कोण? यावरून दोन मंत्र्यांत वादाची चर्चा

पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस आपला निवडणूक दौरा नाशिक येथून सुरू करीत आहे. त्यामुळे हा दौरा विधानसभा निवडणुकीची तयारी आणि उमेदवारांची घोषणा अशा दोन्ही दृष्टीने चर्चेत आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सक्रिय करण्यासाठी निवडलेला हा फंडा आमदारांनाही गुदगुल्या करणाऱ्या आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com