Sunil Tatkare On Ashutosh Kale : अजितदादा मुख्यमंत्री, तर आशुतोष काळेंना मंत्रिपद निश्चित; सुनील तटकरेंनी राष्ट्रवादीचा मंत्री सांगितला

Sunil Tatkare said that Ashutosh Kale will get Minister Ship : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जनसन्मान रॅलीच्या नियोजनासाठी कोपरगावमध्ये मेळावा घेतला. अजितदादा मुख्यमंत्री, तर आशुतोष काळेंना मंत्रिपद निश्चित असल्याचे म्हटले.
Sunil Tatkare On Ashutosh Kale
Sunil Tatkare On Ashutosh KaleSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : कर्मवीर शंकरराव काळे राज्यमंत्री असताना, त्यांच्याबरोबर काम करण्याचा सौभाग्य लाभलं. राज्यमंत्री शंकरराव काळे यांनी केलेले काम जवळून पाहाता आले. आशुतोष काळे यांचे वडील अशोकरराव यांच्याबरोबर देखील विधिमंडळात काम केले.

त्यामुळे तुम्ही आता कोपरगाव मतदारसंघापुरते मर्यादीत राहू नका, असे सांगून आशुतोष काळे यांना मंत्री पद निश्चित असल्याचे सूचक वक्तव्य केले. राज्यात महायुतीचेच सरकार येणार असून, त्यात अजित पवार मुख्यमंत्री असतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे कोपरगाव इथं जनसन्मान रॅली नियोजनासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना महायुतीचे सरकार येणार असून, अजित पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील, असा दावा केला.

कोपरगाव मतदारसंघातील विकास कामे पाहिल्यावर आशुतोष काळे यांचा विजय निश्चित असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगून आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदारसंघापुरते मर्यादीत राहू नये. त्यांनी नगर जिल्ह्यासह आजूबाजूला फिरावे.

आशुतोष काळे यांची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे युवा आमदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात फिराल, त्यावेळी अजित पवार यांच्याबरोबर तुमची देखील ताकद वाढेल, असे सुनील तटकरे यांनी म्हटले.

Sunil Tatkare On Ashutosh Kale
Rohit Pawar : रोहित पवारांच्या अडचणी वाढल्या; बारामतीला परता म्हणत काँग्रेसने मतदारसंघावर ठोकला दावा

सुनील तटकरे यांनी आशुतोष काळे यांना मर्यादीत न राहण्याचा सल्ला देताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. याचा धागा पकडत सुनील तटकरे यांनी मी काही डाॅक्टर नाही.

मात्र कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील भावना ओळखू शकतो. आशुतोष काळे यांना मंत्रिपदाची आपेक्षा मी पूर्ण करेल, असे सुनील तटकरे यांनी म्हणताच मेळाव्यात कार्यकर्त्यांनी पुन्हा जोरदार घोषणाबाजी केली.

Sunil Tatkare On Ashutosh Kale
Prajakt Tanpure Vs Shivaji Kardile : राहुरीचे देणे-घेणे नसल्यांमध्ये एक नगरचे, तर दुसरे लोणीचे; विखे-कर्डिलेंवर तनपुरे संतापले

आमदार आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गेल्या पाच वर्षात दिलेल्या निधीमुळे मतदारसंघात विकास रथ चौहू बाजूने फिरला. पुढचा आमदार मीच होत असतो.

कार्यकर्ते देखील कामाला लागलेत. विकासाच्या बाबतीत अजितदादांचा कोणीही हात धरू शकत नाही. त्यामुळे अजितदादा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार हे निश्चित आहे. यासाठी कार्यकर्ता म्हणून जीवाचे रान करू, असे आशुतोष काळे यांनी म्हटले.

पुराच्या पाण्यात वाहून जात असलेल्या मंजूर इथल्या दोन भावांचा जीव वाचवणाऱ्या ताईबाई पवार यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते 11 हजार रुपये देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इंद्रीस नाईकवाडी आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com