Sunil Tatkare On Uttam Jankar : '...तर तिथं महायुतीचा आमदार निवडून येत असतो'; तटकरेंनी जानकरांना डिवचलं

NCP Sunil Tatkare News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर करत असलेल्या राजीनामाच्या भाषेवर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी टोला लगावला.
Sunil Tatkare On Uttamrao Jankar
Sunil Tatkare On Uttamrao JankarSarkarnama
Published on
Updated on

Sunil Tatkare Shirdi news : "बाहेर राहून मी राजीनामा देत आहे, राजीनामा देत आहे, हा फक्त एक स्टंट आहे. जर त्यांनी राजीनामा दिल्यास तिथं महायुतीचा उमेदवार निवडून येत असतो", असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी आमदार उत्तमराव जानकर यांना डिवचलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर पोटनिवडणूक घ्यावी, अशी मागणी केली आहे. त्यासाठी माझा राजीनामा घ्यावा. मी निवडणुकीला तयार आहे, अशी भूमिका घेतली आहे.

उत्तमराव जानकर(Sunil Tatkare) यांनी आपल्या आमदारकीचा 23 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे राजीनामा देणार असल्याची जाहीर भूमिका मांडली आहे. माळशिरस मतदारसंघातील धानोरच्या ग्रामस्थांनी प्रतिज्ञापत्र देत, मतदान पडताळणीची मागणी केली आहे. यातून माझ्यावर राजीनामासाठी दबाव वाढला असून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे राजीनामा देत असल्याची भूमिका उत्तमराव जानकर यांनी जाहीरपणे घेतली आहे. उत्तमराव जानकर यांच्या हा भूमिकेने खळबळ उडाली आहे.

Sunil Tatkare On Uttamrao Jankar
Uttamrao Jankar : उत्तमराव जानकर येत्या 23 तारखेला मोठा निर्णय घेणार; महाराष्ट्रच नव्हे,तर दिल्लीलाही हादरा बसणार

आमदार उत्तमराव जानकर(Uttam Jankar) यांच्या या जाहीर भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी टोला लगावला आहे. सुनील तटकरे म्हणाले, "ते राजीनाम्याची करत असल्याची भाषा ही निव्वळ स्टंटबाजी आहे. त्यांनी राजीनामा दिल्यास तिथे महायुतीचा उमेदवार निवडून येत असतो. त्यातल्या त्यात ते ज्या यंत्रणेकडे राजीनामा देण्याची भाषा करत आहेत, त्या यंत्रणेचा राजीनामा स्वीकारण्याबाबत रोलच नाही". आमदारकीचा राजीनामा हा विधानसभा अध्यक्षांकडे द्यावा लागतो. त्यानंतर त्याची माहिती पक्षाच्या प्रदेश कार्यालयाला द्यावी लागते. त्यामुळे ही स्टंटबाजी सुरू आहे, असे सुनील तटकरे यांनी म्हटले.

Sunil Tatkare On Uttamrao Jankar
Sunil Tatkare : 'पक्ष विस्तारात जुने बाजूला करू नका'; जिल्हाध्यक्षांच्या भूमिकेवर प्रदेशाध्यक्ष तटकरेंचं मोठं विधान, म्हणाले....

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला(MVA) चांगले यश मिळाले त्यावेळेस त्यांनी आमच्या कर्तृत्वावर यश मिळाल्याचा गौरव केला. विधानसभेत मात्र जनतेने त्यांना नाकारलं. त्यावर त्यांनी अपयशाचे खापर 'ईव्हीएम' मशीनवर फोडण्यास सुरू केली. हा दुटप्पीपणा योग्य नाही, असा टोला देखील सुनील तटकरे यांनी लगावला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com