
Malshiras News : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर हे पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या पक्षात असलेल्या जानकरांनी देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थी करुनही शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी अजित पवारांना टार्गेट करत धैर्यशील मोहिते पाटलांच्या खासदारकीत मोठा वाटा उचलला होता. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या बंपर विजयावरच शंका उपस्थित करत ईव्हीएमवरुन मोठा लढा उभारला होता.आता याच उत्तमराव जानकरांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे.
आमदार उत्तमराव जानकर हे शनिवारी(ता.18)पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते लवकरच आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं विधान करत खळबळ उडवून दिली आहे.ते येत्या 23 तारखेला दिल्लीतील मुख्य निवडणुक आयोगाला हा राजीनामा देणार आहे.
ते म्हणाले, धानोरच्या १२०० लोकांनी याआधीच प्रतिज्ञापत्र करुन इलेक्शन कमिशननी येऊन आमच्या गावाची पडताळणी करावी असं म्हटलं होतं. माझ्यावर या तालुक्यातून प्रचंड असा दबाव आहे. त्याचमुळे मी येत्या २3 जानेवारीला माझ्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं जानकर यांनी जाहीर केलं आहे.
जर 25 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगानं माझी पोटनिवडणूक जाहीर केली नाही.ती निवडणूक बॅलेट पेपरवर व्हावी किंवा व्हीव्हीपॅट मधून चिठ्ठी काढून व्हावं, असं पारदर्शी पद्धतीनं निवडणूक आयोगानं निवडणुक घ्यावी अशी अपेक्षा आहे. जर असा निर्णय आयोगानं नाही घेतला. हा देशव्यापी विषय असून,दिल्लीमध्ये सध्या इलेक्शन सुरू आहे. तिथेही अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधींचा हाच ईव्हीएमचाच मुख्य विषय आहे.त्यांना दिल्लीच्या निवडणुकीतही हेराफेरी होऊ शकते.हीच भीती त्यांच्या मनात आहे.
त्यामुळे ही सगळी मंडळी आमच्या आंदोलनात सहभागी होतील.आंदोलन म्हणा,सत्याग्रह म्हणा, ते येत्या 25 जानेवारीपासून दिल्लीतील जंतरमंतरवर बच्च कडू यांच्यासह सुरु करणार आहोत अशी घोषणा जानकरांनी आता केली आहे.त्यामुळे ऐन दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ 12, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फक्त 18 आमदार निवडून आलेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे 77 आमदार निवडून आलेले आहेत, त्यामुळे महायुतीमधील तीन पक्षांची मिळून संख्या केवळ 107 एवढी आहे, त्यांच्यासोबत दोन ते तीन अपक्ष आहेत, त्यामुळे महायुतीकडे केवळ 110 आमदार आहेत.त्यामुळे जनमत नसलेले हे महायुतीचे सरकार कोणत्याही परिस्थितीत चार महिन्यांत जमीनदोस्त झालेले दिसेल,अशा पद्धतीची व्यूहरचना आम्ही केली आहे, असा दावा केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.