Asim Sarode On NCP Crisis : '' अजित पवारांचा गट बेकायदेशीर आणि...''; कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं खळबळजनक विधान

Maharashtra NCP Political Crisis : अजित पवार गटाकडून पूर्णपणे कायदेशीर लढाईचे तयारी सुरु...
Asim Sarode,Ajit Pawar
Asim Sarode,Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Pune : अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. आता राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. अजित पवारांना ४० आमदारांचं तर शरद पवारांना १५ आमदारांचं समर्थन असल्याची चर्चा आहे. याचवेळी अजित पवारांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हासह अध्यक्षपदावरही दावा केला आहे. आता शिवसेनेसारखीच राष्ट्रवादीतही राजकीयसह कायदेशीर लढाईची होण्याची शक्यता आहे. आता कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी मोठं विधान केलं आहे.

राज्याच्या राजकारणात रविवारी (दि.२) मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. यावेळी अजित पवारां(Ajit Pawar)नी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्यासोबत ८ नेतेमंडळींनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजितदादांच्या या बंडाला आपला पाठिंबा नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर अजित पवार गटाकडून पूर्णपणे कायदेशीर लढाईचे तयारी सुरु केली आहे.

अजित पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अशा आशयाचं पत्रही निवडणूक आयोगाकडे दिलं आहे. याचवेळी आता अजित पवारांचा गट बेकायदेशीर आणि असंविधानिक आहे असं विधान असीम सरोदे यांनी केलं आहे.

Asim Sarode,Ajit Pawar
Raj Thackeray Meets Eknath Shinde: राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा धमाका ? राज ठाकरे अचानक मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

असीम सरोदे(Asim Sarode) म्हणाले, जेव्हा मूळ पक्ष आणि विधीमंडळ पक्ष असा जेव्हा पेच निर्माण होतो. तेव्हा केवळ आमदारांची बहुसंख्या महत्त्वाची नसते, तर त्या बहुसंख्येला काय नाव आहे? आणि त्याची कायदेशीर ओळख काय आहे? हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. या प्रकरणात अजित पवारांच्या गटाला कोणत्याही प्रकारचं कायदेशीर नाव नाही. कायदेशीर चौकटीत त्या गटाला कोणतंही नाव देता येत नाही. त्यामुळे अजित पवारांचा गट बेकायदेशीर व असंविधानिक आहे असं मत सरोदे यांनी सांगितलं.

शिंदे गटाबाबतचा निकाल आणि....

कायदेतज्ज्ञ असीम सरोदे म्हणाले, मागील वर्षी राज्यात घडलेल्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकालावर भाष्य केलं. सरोदे म्हणाले, न्यायालयाने एकनाथ शिंदे(Eknath Shinde) च्या गटाबाबत जो निकाल दिला होता, त्याचा अन्वयार्थ जर आपण व्यवस्थित समजून घेतला, तर अजित पवारांचा गट बेकायदेशीर आहे हे स्पष्टपणे लक्षात येईल.

Asim Sarode,Ajit Pawar
Pankaja Munde Statement: विधान परिषदेचा फॉर्म भरायच्या आधी दहा मिनिटं फोन आला अन् सांगितलं..; पंकजा मुंडेंचा मोठा गौप्यस्फोट

कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातही स्पष्टता आहे. सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवादादरम्यान बहुसंख्येचा मुद्दा चर्चिला होता. त्यामुळे प्रत्येकवेळी लोकशाहीत बहुसंख्या महत्त्वाची नसते असंही सरोदे म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com