Balasaheb Thorat On Rahul Gandhi : राहुल गांधींच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; बाळासाहेब थोरातांचं सूचक ट्विट

Congress Political News : सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेस स्थगिती दिल्याने महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांमध्ये उत्साह संचारला
Balasaheb Thorat - Rahul Gandhi
Balasaheb Thorat - Rahul GandhiSarkarnama

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या जाहीर सभेत सर्व मोदी चोर आहेत असे भाष्य केल्याने गुजरात न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. न्यायालयात तसेच त्यांना दोन वर्षांची शिक्षा दिल्याने त्यांची लोकसभेतील खासदारकी रद्द करण्यात आली होती. यावर गुजरात उच्च न्यायालयाने खालच्या कोर्टाची शिक्षा कायम केल्याने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याने राहुल गांधी आणि पर्यायाने काँग्रेस साठी हा मोठा दिलासा मिळाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेस स्थगिती दिल्याने महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांमध्ये उत्साह संचारला असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधिमंडळातील गटनेते बाळासाहेब थोरात यांनी "सत्यमेव जयते" असे सूचक ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Balasaheb Thorat - Rahul Gandhi
Vijay Wadettiwar On Supreme Court : '' कायद्याच्या चौकटी मोडणाऱ्यांचा सर्वोच्च न्यायालयानेच बंदोबस्त केला; वडेट्टीवारांचा भाजपवर निशाणा

बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून सलग सातवेळेस ते काँग्रेसकडून विधानसभेवर मोठ्या मताधिक्यासह निवडून गेले आहेत. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ अशी त्यांची प्रतिमा राज्यात आणि केंद्रीय काँग्रेस वर्तुळात आहे. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सदस्य आहेत.

2019 लोकसभा निवडणुकीत शिर्डी लोकसभेच्या जाहीर प्रचारासाठी आलेले राहुल गांधी ऐनवेळी आलेल्या अडचणीमुळे बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरात मुक्कामी राहिले. दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी हेलिकॉप्टरमधून थोरात यांना नाशिक येथे सोबत नेत स्वतः सेल्फी घेतली. मुक्कामात राहुल यांनी थोरात-तांबे परिवारातील सदस्यांसोबत गप्पागोष्टी करत आपुलकी व्यक्त केली.

Balasaheb Thorat - Rahul Gandhi
Supreme Court On Rahul Gandhi: राहुल गांधींना कोर्टाकडून मोठा दिलासा; खासदारकी पुन्हा मिळणार..

थोरात-तांबे परिवार हा काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून परिरात विविध पक्षीय आणि सरकार मधील पदे आवर्जून मिळाली ती थोरात यांची गांधी परिवारात असलेल्या वजनामुळे असे बोलले जाते. कालच विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांच्या झालेल्या निवडीत थोरात यांची भूमिका सूचक आणि महत्वाची असल्याचे बोलले जात आहे.

या पार्श्वभूमीवर राहुल गांधी(Rahul Gandhi) यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या शिक्षेच्या स्थगितीमुळे थोरात गटात आनंद व्यक्त होत आहे. त्या अनुषंगाने बाळासाहेब थोरात यांनी "सत्यमेव जयते" अशी मोजकी पण आशयपूर्ण प्रतिक्रिया ट्विट करत व्यक्त केली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com