Supriya Sule : "मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं"; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर फडणवीसांनी एका वाक्यातच विषय संपवला

Supriya Sule meat statement controversy : "मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? असं वक्तव्य शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
Supriya Sule, Devendra Fadanvis
NCP MP Supriya Sule addressing the gathering in Dindori, where her meat remark stirred political debate in Maharashtra.Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 24 Aug : "मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? असं वक्तव्य शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. दिंडोरीतील खेडगाव येथील महात्मा फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

मागील काही दिवसांपासून मांसविक्री बंदीच्या निर्णयावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. देशाच्या स्वातंत्र्य दिनीच काही महापालिकांनी मांसविक्री बंदी केल्याने वाद निर्माण झाला होता. तर जैन समाजाने पर्युषण काळात मांस विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केल्यामुळेही वाद झाला होता.

त्यामुळे मांसाहारावरून राज्यातील राजकारण ढवळून निघालं असतानाच सुप्रिया सुळेंनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. तर सुळेंनी केलेल्या वक्तव्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

Supriya Sule, Devendra Fadanvis
Jayant Patil Exclusive : रिलॅक्स झालेले जयंत पाटील म्हणतात, 'रेंजमध्ये आल्यावर टप्प्यात कार्यक्रम...'

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

दिंडोरीतील कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मी 'राम कृष्ण हरी'वाली आहे. केवळ मी तुळशीची माळ गळ्यात घालत नाही एवढाच फरक आहे. कारण मी कधीकधी मटण खाते. मी इतरांसारखं खोटं बोलत नाही आणि मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे?

Supriya Sule, Devendra Fadanvis
ZP Election 2025 : आरक्षणाचं जुनं सूत्र विसरा; झेडपी, पंचायत समितीसाठी आता आरक्षणाचा नवा फॉर्म्युला!

माझे आई-वडील खातात, सासू-सासरे खातात, माझा नवरा देखील खातो. आम्ही आमच्या पैशाने खातो. यात इतरांना अडचण असण्याचं कारण नाही. आम्ही काही उधार आणून खात नाही. जे आहे ते आहे. आपण कोणाला मिंधे नाही.आम्ही खातो तर खातो."

दरम्यान, या संदर्भातील प्रश्न पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता त्यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "याचं उत्तर मी देणार नाही याच उत्तर महाराष्ट्रातील तमाम वारकरी देतील."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com