Supriya Sule : आंदोलकांचा घेराव, बाटल्या फेकल्या तरीही सुप्रिया सुळे यांची शांत प्रतिक्रिया, काय म्हणाल्या?

Maratha reservation protest : काल मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानात भेटायला गेलेल्या सुप्रिया सुळे यांना आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आंदोलकांनी यावेळी शरद पवार यांच्या विरोधातही घोषणा दिल्या होत्या.
Supriya Sule On Maratha reservation protest
Supriya Sule On Maratha reservation protest Sarkarnama
Published on
Updated on

Supriya Sule : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सु्प्रिया सुळे यांनी काल मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. सुळेंनी जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. दोघांमध्ये चर्चा झाली. मात्र, भेटीनंतर बाहेर पडताना आंदोलकांनी सुप्रिया सुळेंना घेराव घातला, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करा म्हणत त्यांच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या, गाडी अडवली तसेच शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली, मराठा समाजाचे खरे वाटोळे शरद पवारांनीच केल्याचे काही आंदोलकांनी म्हटले. त्यावर सुप्रिया सुळे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात माध्यमांशी त्या बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, इतकं मोठं आंदोलन सुरु आहे, अशात एखादी अशी गोष्ट घडने ठिक आहे. तरुण मुले आहेत, त्यांच्या काही भावना आहेत. पाटलांची तब्येत खराब झाली होती, माझी नैतिक जबाबदारी असल्याने मी काल तिथे गेले. थोडक्यात चर्चा केली. आंदोलकांची गैरसोय होत आहे कारण पाऊस प्रचंड आहे, काही ठिकाणी लाईट नाहीये. मुंबई महापालिका व सरकारला माझी विनंती आहे. आंदोलनाच्या ठिकाणच्या स्वच्छेतेकडे लक्ष द्या. काही लाइट्स तिथे लावण्याची गरज आहे.

दरम्यान वेळोवेळी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सरकारकडून पवार साहेबांवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं असा प्रश्न केला असता त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला हीच गंमत वाटते की आम्हाला संपलं संपलं असं म्हणतात. छोटो पक्ष म्हणून हिणवतात. आणि जेव्हा इतकं मोठं आंदोलन उभं राहतं तेव्हा त्याचा केंद्रबिंदू शरद पवार असतात. आणि सत्ता सगळी त्यांच्याकडे असतानाही 250 आमदार आणि 300 खासदार असलेला पक्ष पुन्हा शरद पवारांकडेच वळतो. हे म्हणजे सरकारची कमाल आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Supriya Sule On Maratha reservation protest
Manoj Jarange Protest : जरांगेंच्या आंदोलनाचा सर्वात मोठा फायदा नाशिक विभागाला : सर्वात कमी मराठवाड्याला

गल्ली पासून दिल्लीपर्यंत सलग अकरा वर्षे भाजपचे सरकार आहे. २०१८ साली मा. मुख्यमंत्र्याचं एक भाषण आहे. फडणवीसांनी त्यांच्या भाषणात जो मार्ग आरक्षणाचा सांगितला होता त्याची अंमलबजावणी करावी, आज ते सत्तेत आहेत. मराठा आंदोलनाला जबाबदार आत्ताचे सरकार आहे. आजूनही आंदोलन हाताच्या बाहेर नाही, सरकारला मी विनंती करते की, सर्वपक्षीय बैठक बोलवा व सगळ्यांशी चर्चा करा जर हा निर्णय घ्यायचा असेल तर कॅबिनेट बोलवा. अधिवेशन बोलावा, 24 तासात हे सगळं मान्य करून टाका अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना करते असं त्या म्हणाल्या.

Supriya Sule On Maratha reservation protest
MLA Mangesh Chavan : आमदार मंगेश चव्हाण यांना 'त्या' महिलेनं तोंडावर पाडलं, तक्रार देण्यास ऐनवेळी दिला नकार

आंदोलनाला कोण रसद पुरवतंय हे देशाला कळू दे. रसद पुरवणाऱ्यांची यादी तातडीने जाहीर करा. गृहखात्याला माहिती आहे तर आम्हालाही कळू द्या. दुसरी गोष्ट या देशात आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने सर्वांना दिला आहे. आझाद मैदानात सरकार अजून का पोहोचलं नाही, असाही सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com