Raver Lok Sabha 2024: 'रावेर'चा गड खालसा करण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी, भाजपच्या 'या' नेत्याला उमेदवारी?

Amol Jawale News : रावेरमधून नेमके कुणाला मैदानात उतरवायचे? असा प्रश्‍न राष्ट्रवादी (शरद पवार) समोर आजही कायम आहे. राज्यातील अन्य महत्त्वपूर्ण मतदारसंघांमधून उमेदवार जाहीर होत असताना रावेरमधील सक्षम उमेदवाराचा शोध अद्याप संपलेला नाही.
Rohit Pawar Supriya sule  Amol Jawale
Rohit Pawar Supriya sule Amol Jawalesarkarnama

Loksabha Election 2024 : भाजपने रावेर मतदारसंघातून रक्षा खडसेंना उमेदवारी दिली, तर 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाकडून चर्चेत असलेले एकनाथ खडसे यांनी माघार घेतली. मात्र, भाजपमध्ये रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे अजूनही नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा'कडून त्यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. स्वत: सुप्रिया सुळे, रोहित पवार (Rohit Pawar) त्यासाठी जावळेंच्या संपर्कात असून, त्यामुळेच रावेरचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही, असेही सांगितले जात आहे.

रावेर मतदारसंघातून ( Raver Loksabha Constituency) भाजपने या वेळी सलग तिसऱ्यांदा रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाकडून माजी मंत्री, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रकृतीचे कारण देत लढण्यास नकार दिला. पाठोपाठ त्यांच्या कन्या रोहिणी खडसेंनीही (Rohini Khadse) त्या विधानसभेची तयारी करत असल्याचे सांगत असमर्थता दर्शवली. त्यामुळे रावेरमधून नेमके कुणाला मैदानात उतरवायचे? असा प्रश्‍न राष्ट्रवादी (शरद पवार) समोर आजही कायम आहे. राज्यातील अन्य महत्त्वपूर्ण मतदारसंघांमधून उमेदवार जाहीर होत असताना रावेरमधील सक्षम उमेदवाराचा शोध अद्याप संपलेला नाही.

खडसे पिता- पुत्रीच्या नकारानंतर जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्यासह कॉन्ट्रॅक्टर विनोद सोनवणे यांच्या नावाची चर्चा झाली. मात्र, या कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झाले नाही. त्यातून उद्योजक श्रीराम पाटील यांचेही नाव समोर आले. मात्र, अद्यापही निर्णय झालेला नाही. रावेर लोकसभा मतदारसंघ जातीय समीकरणात लेवाबहुल असल्याने व त्या समाजाचा एकमेव प्रतिनिधी राज्यात खासदार म्हणून निवडून जात असल्यामुळे पक्षातर्फे त्या समाजाचा उमेदवार देण्यावरच प्राधान्य दिले जाते.

त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे अशाच उमेदवाराचा शोध सुरू होता. त्यामुळेच पक्षातर्फे मतदारसंघात उमेदवारांचे नाव जाहीर करण्यास विलंब होत आहे. त्यातूनच भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज असलेले भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांना उमेदवारी देण्याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. हरिभाऊ जावळे खासदार असताना शरद पवार आणि त्यांची मैत्री होती. जावळे हे मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असताना शरद पवार त्यावेळी देशाचे कृषिमंत्री होते.

Rohit Pawar Supriya sule  Amol Jawale
Dhule Lok Sabha Constituency : भाजप लागला प्रचाराला; पण काँग्रेसला उमेदवारच मिळेना...!

समर्थकही नाराज

2014 ला हरिभाऊ जावळेंची जाहीर झालेली उमेदवारी ऐनवेळी रद्द करून भाजपने रक्षा खडसेंना तिकीट दिले होते. त्यावेळीही शरद पवारांनी राष्ट्रवादीकडून जावळेंना उमेदवारीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, हरिभाऊ ‘हलले’ नाहीत. आता अमोल जावळेंना भाजपकडून उमेदवारीची अपेक्षा असताना त्यांना ती मिळू शकली नाही. त्यामुळे ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या समर्थकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

पवार-जावळे कुटुबांची जवळीक

अमोल जावळे नाराज असल्याने पवार कुटुंबीय पुन्हा एकदा जावळे कुटुंबासाठी उमेदवारीचा प्रस्ताव देत असल्याचे वृत्त आहे. सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात अमोल जावळेंना थेट विचारणा केल्याची माहिती असून, रोहित पवारांवर त्यासंबंधी जबाबदारी सोपविण्यात आल्याचेही बोलले जात आहे. मात्र, याबाबत अमोल जावळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. त्यांचा फोन नॉटरिचेबल येत आहे.

एकतर हरिभाऊ जावळे व शरद पवारांचे निकटचे संबंध होते. पवार केंद्रात कृषिमंत्री असताना जावळेंकडून केळीविषयीचे प्रश्‍न त्यांनी जाणून घेत त्यावर त्या-त्या वेळी उपाययोजनांसाठी तरतूद केली होती. रक्षा खडसे यांच्यासमोर अमोल जावळे तुल्यबळ उमेदवार असू शकतात, असा शरद पवार गटाचा दावा आहे.

(Edited By Roshan More)

R

Rohit Pawar Supriya sule  Amol Jawale
Mohan Patil Arrest : अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षाला अटक, आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com