Supriya Sule Politics: सुप्रिया सुळे यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले; आपण विरोधी पक्षात आहोत, आक्रमक व्हा!

Supriya Sule; Strongly oppose ruling party, raise public issues, spokespersons must active -आरक्षणाच्या वादात जनता आणि शेतकऱ्यांचे खरे प्रश्न बाजूला पडले
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Supriya Sule News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर झाले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक झाले पाहिजे. आपण विरोधी पक्ष आहोत, हे विसरू नका, या शब्दांत पदाधिकाऱ्यांना सक्रीय होण्याचा सल्ला दिला.

खासदार सुप्रिया सुळे यांनी भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचवर आपली तिखट प्रतिक्रिया दिली. भाजप दहशतवाद आणि चर्चा एकत्र होणार नाही असे म्हणते. मग पाकिस्तानशी क्रिकेट सामने कसे होतात. मी तरी हा सामना कदापी पाहणार नाही.

आरक्षणाच्या प्रश्नावर देखील त्यांनी परखड मत व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात चार पाच दिवसांचे सर्वपक्षीय अधिवेशन बोलवावे. आवश्यकतेनुसार शिबिर अथवा बैठक घ्यावी. त्यात सगळ्यांचे मत आणि सामाजिक स्थिती जाणून घेऊन राज्याच्या हिताचा निर्णय घ्यावा, असे खासदार सुळे म्हणाल्या.

Supriya Sule
Sharad Pawar : कवडीचाही संबंध नाही..जरांगेंच्या आंदोलनावर शरद पवारांचा मोठा खुलासा

यावेळी खासदार सुळे यांनी कार्यकर्ते आणि पक्षाच्या प्रवक्त्यांना चांगलाच डोस दिला. चुकीचे काम होत असेल तर त्याला प्रखर विरोध करा. त्यासाठी कार्यकर्त्यांनी मैदानात उतरा. आंदोलन करण्याची उर्मी प्रत्येकाच्या मनातून आली पाहिजे.

Supriya Sule
Balasaheb Thorat Congress : 35 वर्ष खासदारकी तुमच्याकडेच होती, पण खडा तरी उचलला का? विरोधकांना मदत करणारा मीच; बाळासाहेब थोरातांची जोरदार फटकेबाजी

वरिष्ठ सांगतील तेव्हा आंदोलन करणे हे बरोबर नाही. आपल्याकडून समाजाच्या आणि लोकांच्या काही अपेक्षा आहेत. जनतेच्या प्रश्नांवर आपण लढलेच पाहिजे. त्यासाठीच लोकांनी आपल्याला निवडून दिले आहे, हे लक्षात ठेवा. पक्ष पूर्ण ताकदीने कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहील.

यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचे उदाहरण दिले. आमदार आव्हाड दीड लाख मतांनी कसे विजयी झाले. ते आणि त्यांचे कार्यकर्ते रोज रात्री आपण किती मतदार जोडले याचा हिशेब मांडत असत. ते त्यांचे सीक्रेट आहे. त्यामुळेच ते निवडून येतात.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पहिली टेस्ला कार खरेदी केली. त्यावर लोकांनी रोलिंग करत अनेक प्रश्न मांडले. युवक विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी हे प्रश्न मांडले पाहिजे. त्यासाठी आपण विरोधी पक्षात आहोत. आपल्याकडून लोकांची तीच अपेक्षा आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. कार्यकर्त्यांनी राज्य शासनाच्या विरोधात सक्रिय व्हावे. निष्क्रियता सोडून जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवावा. आंदोलने करावीत.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com