Balasaheb Thorat Congress : 35 वर्ष खासदारकी तुमच्याकडेच होती, पण खडा तरी उचलला का? विरोधकांना मदत करणारा मीच; बाळासाहेब थोरातांची जोरदार फटकेबाजी

Sangamner Bhausaheb Thorat Sugar Factory Meeting Balasaheb Thorat Criticizes Ruling Opponents : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर वार्षिक सर्वसाधारण काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सत्ताधारी विरोधकांवर टीका केली.
Congress Balasaheb Thorat
Congress Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

Sangamner Congress politics : काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भोजापूर चारीवरून सत्ताधारी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.

'प्रत्यक्ष कामाशिवाय गावाची, तालुक्याची अन् जिल्ह्याची प्रगती होत नाही. 35 वर्ष खासदारकी तुमच्याकडे होती, पण तुम्ही एक खडा तरी उचलला का? विरोधक फक्त भाषणं करून, मिरवणुका काढून लोकांना भ्रमित करतात,' असा टोला थोरातांनी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता लगावला.

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले, "मोठे कार्यक्रम झाले, घोषणा दिल्या, मिरवणुका निघाल्या. मात्र पाच ते सहा महिन्यात भोजापूर चारीला पाणी आपोआप येते का? आमच्या सत्तेत असताना चारीचे काम आम्ही केले. सुदैवाने यावर्षी मे महिन्यात पाऊस भरपूर पडल्याने पाणी आले आणि खालीही गेले." काम सगळे आम्ही केले, पण तुम्ही खोट्या-नाट्या गोष्टींचे श्रेय घेता. आयत्या पीठावर रेघोट्या ओढता, अशा शब्दांत थोरात यांनी टीका केली.

'35 वर्ष खासदारकी तुमच्याकडे होती, पण तुम्ही एक खडा तरी उचलला का? विरोधक फक्त भाषणं करून, मिरवणुका काढून लोकांना भ्रमित करतात. प्रत्यक्ष काम केल्याशिवाय तालुक्याची प्रगती होत नाही. आम्ही जेव्हा सत्तेत होतो, तेव्हा प्रत्यक्ष कामे केली. आता तेच काम तुम्ही आपले म्हणून मिरवता हे लोकांना माहीत आहे,' अशी फटकेबाजी देखील थोरातांनी केली.

Congress Balasaheb Thorat
Political Dynasty in India : दर पाचपैकी एक लोकप्रतिनिधी 'घराणेशाही'तून; उत्तर प्रदेश अन् महाराष्ट्राचं स्थान कितवं?

'जे लोक प्रतिनिधी झाले त्यांनी लोकांची कामे करायला हवीत. पण तुम्ही कोणाच्या इशाऱ्यावर चालता ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. सध्या काही लोक फक्त संगमनेर (Sangamner) तालुक्याची शांतता बिघडविण्याचे काम करत आहेत. कुणाची जिरवा, खोटे गुन्हे दाखल करणे हेच सुरू आहे. याचा बंदोबस्त आपण सर्वांनी मिळून करायला हवा. तालुका आदर्श पद्धतीने उभा केला आहे, त्याचा अभिमान प्रत्येकाने जपावा,' असेही थोरात यांनी म्हटले.

Congress Balasaheb Thorat
CM Fadnavis on reservation issue : आरक्षणावरून सीएम फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले, 'एकही नकली व्यक्ती...'

जिरवा-जिरवीच्या राजकारणावर भाष्य करताना, 'मी दीडशे कोटींचे रस्ते मंजूर केले होते, पण तेही तुम्ही रद्द केले. तीन महत्त्वाच्या योजना मंजूर केल्या, पण त्या देखील रद्द केल्या. त्याचा शोध घ्या. संगमनेरच्या सहकाराचे नाव आज सर्वत्र घेतले जाते. एक नंबरच्या गुणवत्तेच्या संस्था आपण उभ्या केल्या आहेत. विरोधकांना देखील मदत करणारा मीच आहे. 40 वर्षात काय केले असा प्रश्न विरोधक विचारतात तुम्ही त्यांना उत्तर दिले पाहिजे. 40 वर्षांच्या मेहनतीने हा सहकार उभा केल्याचा दावा,' बाळासाहेब थोरातांनी केला.

भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर 58वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, पांडुरंग घुले, बाजीराव खेमनर, माधव कानवडे, रणजितसिंह देशमुख, बाबा ओहोळ, आर.बी. राहणे, शंकर खेमनर, दुर्गा तांबे, इंद्रजित थोरात, डॉ. जयश्री थोरात, सुनंदा भागवत आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com