Donald Trump Agriculture Policy: कृषी धोरणात तरी ट्रम्प नको! मोदी सरकारला सुप्रिया सुळेंचा टोकाच्या लढाईचा इशारा

Donald Trump agricultural model criticism in India: अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांनी कृषी धोरणात हस्तक्षेप करणाऱ्या भूमिकेला भारत सरकारने निर्णय घेतल्यास टोकाची लढाई लढण्याचा इशारा सुप्रिया सुळेंनी दिला.
Donald Trump agriculture
Donald Trump agricultureSarkarnama
Published on
Updated on

Trump Modi Agriculture Issue: अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळे धोरणं राबवत आहे. टॅरिफ धोरणामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार जगत ढवळून निघालं आहे. ही राबवताना आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापारा किती फटका बसतो, याचा विचार करताना दिसत नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धोरणांना भारताला देखील जबर फटका बसू लागला आहे. केंद्र सरकार देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणासमोर झुकत असल्याचे दिसते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रातील मोदी सरकारला सूचक असा इशारा दिला आहे.

खासदार सुप्रिया सुळे या संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले इथं दौऱ्यावर होत्या. यावेळी आयोजित शेतकरी (Farmer) मेळाव्यात त्यांनी मोदी सरकारच्या कृषी धोरणावर सूचक असा इशारा दिला. शेती पिकांना भाव मिळत नसल्याने, शेतकरी हवालदिल झाल्याचे सांगून या अतिवृष्टीच्या काळातच कर्जमाफी हवी आहे, अशी मागणी केली. शेतकऱ्यांचा सात-बारा संपूर्ण कोरा होईपर्यंत, सरसकट कर्जमाफी होईपर्यंत, या सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला.

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या धोरणासमोर झुकत असलेल्या केंद्रातील मोदी सरकारला सुप्रिया सुळे यांनी सूचक असा इशारा दिला. त्या म्हणाल्या, "डोनाल्ड ट्रम्प काही तरी असं करत आहेत की, यातून तुमचं-आमचं नुकसान होईल, अशी परिस्थिती आहे. मी तुम्हाला शब्द, जरी आम्ही विरोधात असलो, अन् ट्रम्पबाबानं काहीही चुकीच्या मागण्या केल्या, अन् भारत सरकारने शेतीबाबत कुठलंही चुकीचं धोरण केलं तर, मग भारत सरकारविरोधात टोकाची लढाई लढली जाईल."

Donald Trump agriculture
Ravi Rana Vs Yashomati Thakur : राणांनी खोडी काढली, यशोमती ठाकूर यांचा संताप; म्हणाल्या, 'भैया-भाभी अवकातीत...' (Video)

काँग्रेसने 70 वर्षांत हे केलं

'कारण की, आजपर्यंत अमेरिकेबरोबर पवारसाहेब किंवा काँग्रेस सरकार असेल, आम्ही आणि काँग्रेसने 70 वर्षांत काय केलं असेल, तर गेल्या 70 वर्षात अमेरिकेला भारताच्या शेतीमध्ये एक इंच सुद्धा येऊ दिलेलं नाही. या सरकारने, भारत सरकारने अमेरिकेला भारतातील शेतीमध्ये येऊ दिलं, तर मग टोकाची लढाई आहे. आपल्या सगळ्यांना रस्त्यावरून, लढाई लढावी लागले,' असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

Donald Trump agriculture
Top 10 News : डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; फलटण प्रकरणात PSI बदनेचा दावा; राम सातपुतेंनी सांगितली विधानसभा मतदानाची इनसाईड स्टोरी यासह वाचा Top Ten राजकीय घडामोडी...

पवारसाहेबांचं बारकाईनं लक्ष

'अमेरिकेशी बाकी सगळ्यात मैत्री ठेवू, पण शेतीमध्ये येऊ देणार नाही. अन् ही मोठी लढाई आहे. ही होईल की, नाही हे माहिती नाही. पण आम्ही जोरात रेटतोय, पवारसाहेब देखील लक्ष ठेवून आहोत', असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

महिलांना आवाहन

'परदेशाची मैत्री ठेवावी, देवाण-घेवाण ठेवावं, मोबाईल मध्ये गुंतवणूक करू, इन्फोसिस मध्ये देवाण-घेवाण करू. परंतु भारताच्या शेतीमध्ये कोणत्याही प्रकारची परदेशातील माणूस गुंतवणूक करून घेणार नाही, म्हणजे नाही. आपल्याला मोठी लढाई लढाईची आहे. पुढील पंधरा दिवसांमध्ये आपल्याला नेमकं काय होतंय ते कळेल. महिलांनी देखील लढाईची तयारी ठेवावी. आता त्या सत्तेत 50% ने सहभागी आहेत,' असे सांगून सुप्रिया सुळेंनी लढाईची तयारी सुरू केल्याचे सूचक असे विधान केलं.

अमेरिकेचा 'टॅरिफ बाॅम्ब'

भारताने रशियाकडून पूर्णपणे इंधन खरेदी बंद करावी, अशी डोनाल्ड ट्रम्प यांची मागणी आहे. यावरून त्यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लादला आहे. असे असले तरी, भारताने रशियाकडून इंधन खरेदी पूर्णपणे बंद केलेली नाही.

अमेरिकेने रशियाच्या दोन मोठ्या तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यानंतर काही भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांनी रशियन कच्च्या तेलाची खरेदी खूपच कमी केली आहे. तथापि, भारत आणि चीन हे अजूनही रशियन तेलाचे मोठे ग्राहक आहेत, आणि काही व्यवहार अजूनही सुरू आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com