Greenfield Highway Land Issue: भरपाईसाठी शेतकऱ्यांचे शरद पवार यांना साकडे!

Surat-Chennai Greenfield Highway Land Affected Farmers Meet Sharad Pawar : सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड बाधितांनी समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर भरपाईची मागणी केली आहे.
Farmers with Sharad Pawar
Farmers with Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar News : सुरत-चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गासाठी नाशिक परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनींचे भुसंपादन करण्यात येणार आहे. मात्र त्याचे मुल्यांकण आणि भरपाई देताना अन्यायकारक पद्धतीने आकारणी होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. (Grrenfield highway land affected farmers in a mood to fight with State Government)

यासंदर्भात शेतकऱ्यांनी (Farmers) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. राज्य शासनाकडून (Maharashtra Government) याबाबत अन्याय केला जात असल्याची तक्रार केली आहे.

Farmers with Sharad Pawar
Nitesh Rane News : नितेश राणेंच्या आरोपानंतर दुय्यम निबंधक खांडेकरांना हटवले!

या महार्गामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी शेतकऱ्यांची शरद पवार यांच्याशी भेट व्हावी यासाठी प्रयत्न केले.

सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गालगत सर्व्हिस रोड, रस्त्याच्या कडेला साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी करण्यात येणारे ड्रेनेज करण्यात आलेले नाही. तसा प्रस्ताव रस्त्याच्या कामात समाविष्ट नाही. महामार्गाच्या क्रॉसिंगवर कोणतीही पाइपलाइन टाकण्यात येणार नाही. या व्यवस्था नसल्याने लगतच्या शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.

महामार्गासाठी जमिनीचा अत्यल्प मोबदला देऊन जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. द्राक्ष व इतर फळबागांच्या वेलींना रोपटे संबोधून तुटपुंजा दर ठरवला आहे. यासंदर्भात सकारात्मक मार्ग काढू, असे आश्वासन पवार यांनी दिले. येत्या सप्ताहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Farmers with Sharad Pawar
Eknath Khadse News : गिरीश महाजन आणि मुश्रीफ यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com