Eknath Khadse News : गिरीश महाजन आणि मुश्रीफ यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे!

Girish Mahajan & Hassan Mushrif Have No Right to Hold Post : नांदेड जिल्हा रुग्णालयात गेल्या दोन दिवसांत ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्याला राज्य सरकार जबाबदार आहे.
Eknath Khadse & Girish Mahajan
Eknath Khadse & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Khadse On Nanded Civil Hospital : नांदेड येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या ४८ तासांत जवळपास ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात १६ नवजात शिशूंचा समावेष आहे. या घटनेने राज्य सरकारचा गलथानपणा उघडकीस आल्याने जनतेत प्रचंड रोष आहे. (NCP leader Eknath Khadse criticized maharashtra Government Ministers)

नांदेड रुग्णालयातील (Maharashtra) विविध वैद्यकीय सुविधांचा अभाव तसेच उपचारातील अडथळे यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप होत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर टिका केली आहे.

Eknath Khadse & Girish Mahajan
Praniti Shinde Solapur Politics : प्रणिती शिंदे थोपवणार का मोदी लाट? काय असेल सोलापूरसाठी काँग्रेसची रणनीती ?

नांदेड येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णाच्या मृत्यू प्रकरणी तेथील पालकमंत्री गिरीश महाजन तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, असे खडसे म्हणाले.

खडसे यांनी सांगितले, की नांदेड येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात घडलेली घटना दुर्दैवी आहे. उपचाराअभावी रुग्ण दगावणे, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. अगोदरच राज्यात बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे.

शासन याबाबत गंभीर नाही. त्यात आता नांदेड येथे बालकावर उपचार करण्याचा हलगर्जीपणा करणे, हा निष्क्रियतेचा कळस झाला आहे. राज्यात जिल्हा शासकीय रुग्णालयात औषध पुरवठा शासनाकडून न होणे हीसुद्धा अत्यंत गंभीर बाब आहे. याला माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन व विद्यमान वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ जबाबदार आहेत.

Eknath Khadse & Girish Mahajan
Shiv Sena MLA Disqualification : ठाकरे गटाचे टेन्शन वाढले; 'आमदार अपात्रता' सुनावणी पुन्हा लांबणीवर, 'या' तारखेला...

महाजन यांनी पालकमंत्री म्हणून किती वेळा या रुग्णालयाला भेट दिली?. गेली पाच वर्षे तेच वैद्यकीय शिक्षणमंत्री होते, त्या वेळी त्यांनी काय केले?, असा प्रश्नही निर्माण होत आहे. नैतिकता ठेवून दोघांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही खडसे यांनी केली आहे.

Eknath Khadse & Girish Mahajan
Hemant Patil News : डीन वाकोडेंना शौचालय साफ करण्यास सांगणे खासदार हेमंत पाटलांच्या अंगलट; ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com