Nitesh Rane News : नितेश राणेंच्या आरोपानंतर दुय्यम निबंधक खांडेकरांना हटवले!

Malegaon`s Assistant Deputy Registrar Khedkar Removed : मालेगाव शहरातील लॅंड जिहादचा प्रश्न नीतेश राणे यांनी उपस्थित केला होता.
Nitesh Rane
Nitesh RaneSarkarnama
Published on
Updated on

Malegaon Land Jihad News : भारतीय जनता पक्षाचे नेते नितेश राणे यांनी मालेगाव शहरात नियमबाह्य पद्धतीने गुंठेवारीच्या खरेदीच्या नोंदणीद्वारे लँड जिहाद सुरू असल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली होती. (BJP leader Nitesh Rane was accused on Land jihad in Malegaon)

दरम्यान नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या आरोपानंतर शासनाने (Maharashtra Government) मालेगाव (Malegaon) येथील सहाय्यक दुय्यम निबंधकांचा पदभार काढून घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीतून काय बाहेर पडते याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Nitesh Rane
Eknath Khadse News : गिरीश महाजन आणि मुश्रीफ यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे!

भारतीय जनता पक्षाचे आमदार नीतेश राणे यांनी नुकतीच मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी मालेगाव शहरात लॅंड जिहाद सुरू असल्याचे म्हटले होते. त्यांनी केलेल्या आरोपांनुसार गुंठेवारी दस्तनोंदणी बंद असताना मालेगाव शहरात मात्र असे प्रकार सुरू आहे. गुंठेवारीची नोंदणी केली जाते.

श्री. राणे यांच्या आरोपानंतर राज्य सरकारने देखील त्याची दखल घेतली होती. या प्रकरणाची माहिती मागविण्यात आली. त्यानंतर मालेगावचे सहाय्यक दुय्यम निबंधक ज्ञानेश्वर खांडेकर यांचा पदभार काढून घेण्यात आला आहे. त्यांचा पदभार सहाय्यक दुय्यक निबंधक सागर बच्छाव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

काय म्हणाले होते नितेश राणे...

मालेगाव शहरात लँड जिहाद सुरू आहे. त्यात प्रशासनातील अधिकारी सहभागी आहेत. त्याची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी. संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. गुंठेवारी खरेदी-विक्रीचे दस्तनोंदणी बंद आहेत. त्याबाबत सर्वोच न्यायालयात महाराष्ट्र शासनाकडून याचिका दाखल आहे.

याबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत, मात्र त्यावर कारवाई झालेली नाही. बिनशेती न करता बेकायदेशीर गुंठेवारी पद्धतीने प्लॉटची खरेदी-विक्री करणे व तुकडे प्रतिबंधक कायद्याविरोधात जाऊन गुंठेवारी पद्धतीने खरेदी-विक्री करून देण्यात येत आहे.

Nitesh Rane
Praniti Shinde Solapur Politics : प्रणिती शिंदे थोपवणार का मोदी लाट? काय असेल सोलापूरसाठी काँग्रेसची रणनीती ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com