`स्वाभिमानी`चे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप म्हणाले, `मी नावाला प्रदेशाध्यक्ष, घरात मात्र वाळवंट...`

अस्मानी संकटामुळे नुकसान झाल्याने स्वाभिमानीच्या प्रदेशाध्यक्षांनी द्राक्ष बागेवर चालवली कुऱ्हाड
Sandip Jagtap
Sandip JagtapSarkarnama

नाशिक : सध्या मी चळवळीत आल्याची फळं भोगतोय. सततच्या अस्मानी, सुलतानी संकटांमुळे द्राक्षबागांचे नुकसान आणि दरवर्षीची आर्थिक जुळवाजुळव करताना होणाऱ्या कसरतीला वैतागून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप (Sandip Jagtap) यांनी आपल्या २० गुंठे द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालविली.

Sandip Jagtap
मोठी बातमी : सिव्हील इंजिनिअरकडून प्रेयसीसाठी ५६ चेन स्नॅचिंग, आजवरची सर्वात मोठी चोरी!

ते म्हणाले, ‘मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चळवळीत आलो कधी अन्‌ विरघळलो कधी, कळलेच नाही. शेतकरी संपानंतर राजू शेट्टी यांचे बोट धरले अन्‌ साहेबांनी माझ्यासारख्या फाटक्या माणसाला खूप कमी दिवसांत राज्याचे अध्यक्ष केले. अर्थात, आज हे का आठवतंय, तर मी आता माझी द्राक्षाची बाग तोडतोय..!

Sandip Jagtap
आजचा शेतकरी हजारो तोंडाच्या रावणासोबत लढत आहे

प्रा. जगताप यांना साडेतीन बिघे जमीन आहे. सगळी द्राक्षाची बाग... ती उभी करायला वडिलांनी आयुष्याची सगळी पुंजी संपविली. मुलगा लक्ष देईल, दोन पैसे घरात येतील, असे वडिलांना वाटले होते. पण, झाले वेगळेच. अस्मानी संकटामुळे सलग तीन वर्षे बागेला फळ आले नाही. खर्च व कर्ज वाढत चालले म्हणून प्रा. जगताप यांनी द्राक्षबाग तोडण्याचा निर्णय घेतला.

नावाला प्रदेशाध्यक्ष, घरात मात्र वाळवंट...

प्रा. जगताप म्हणतात, मी बाहेर नावाला प्रदेशाध्यक्ष; पण घरात मात्र वाळवंट... वडिलांची दोन हजार रुपये पेन्शन अन्‌ मला सीएचबीचा खर्च जाऊन सात-आठ हजार रुपये येणाऱ्या पगारावर घर चालवायचे. मुलाचे शिक्षण, आईचा आजार अन्‌ वरून संघटनेसाठी प्रवास करायचा तर हलाखीची परिस्थिती, संकटे, गरिबीविरुद्ध माझ्यापेक्षा माझे कुटुंबच ताकदीने लढले. त्यांनी कधीच माझ्या पायात बेडी अडकविली नाही. राज्याचा अध्यक्ष म्हणून अनेक लोक त्यांच्या जिल्ह्यात बोलवत असतात. पण, मी जाऊ शकत नाही. प्रवासाला अनेकदा पैसेच नसतात. घरखर्चात काटकसर करून वडील मला उरलेले सगळे पैसे देतात. पण, ते देऊन-देऊन किती देणार? महिन्यात फार तर तीन ते चार हजार उरतात. काटकसरीने एखाद्या जिल्ह्याचा प्रवास होऊ शकतो. पण, हे कोणाला सांगता येत नाही. वरून अनेक लोक म्हणतात. प्रदेशाध्यक्षाला काय कमी आहे? लोक हेही म्हणतात, संघटना तुला प्रवासाला पैसे देत असेल. लोकांना सत्य माहीत नसते, याची खंत प्रा. जगताप यांनी मांडली.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com