ACB Nashik Trap : महसूल सप्ताहातच तहसीलदाराने १५ लाखांची लाच घेतली!

Tahsildar Bahiram caught while takin15 lacs bribe-लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला तहसीलदारावरील सापळा यशस्वी
Nareshkumar Bahiram
Nareshkumar BahiramSarkarnama

Nashik ACB News : राज्य शासनाकडून आपली प्रतिमा उजळण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’, ‘महसूल सप्ताह’ असे विविध उपक्रम सुरू आहेत. मात्र त्यातील फोलपणा दाखवणारी घटना शहरात घडली. ‘महसूल सप्ताह’ साजरा करीत असतानाच नाशिकचे तहसीलदार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अडकले. (Tahsildar caught by ACB for accepting bribe in Nashik)

नाशिक (Nashik) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गौण खनिज प्रकरणातील भ्रष्टाचाराशी संबंधीत (Revenue) प्रकरणात नाशिकचे तहसीलदार नरेशकुमार बहिरम (वय ४४) यांना १५ लाखांची लाच घेताना अटक केली.

राजूर बहुला (नाशिक) येथील जमिनीच्या उत्खननासंदर्भात सव्वा कोटीचा दंड केलेल्या प्रकरणाची फेरचौकशी करताना तहसीलदारांनी १५ लाखांच्या लाचेची मागणी केली होती.

जमिनीत मुरमाचे उत्खनन करण्यात आले होते. त्यासंदर्भात नियमानुसार पाचपट दंड व स्वामित्वधन जागा भाडे मिळून त्यांना एक कोटी २५ लाख सहा हजार २२० रुपयांचा दंड आकारण्यात आला होता.

Nareshkumar Bahiram
Bhaskar Jadhav On BJP : भास्कर जाधवांचे 'ते' शब्द भाजपच्या जिव्हारी लागणार ?

यासंदर्भात जमीन मालक यांनी या आदेशाविरुद्ध नाशिकच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील केले होते. त्यानुसार हे प्रकरण पुनश्च फेरचौकशीसाठी तहसीलदारांकडे पाठविण्यात आले होते.

या मिळकतीमधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर झाल्याचे जमिनीच्या मालकांनी त्यांच्या कथनात नमूद केले होते. याबाबत पडताळणी करण्यासाठी तहसीलदार बहिरम यांनी जमिनीच्या मालकांना स्थळ निरीक्षणावेळी बोलावले होते.

Nareshkumar Bahiram
Jitendra Awhad Tweet : आव्हाडांच्या ट्विटने समर्थकांमध्ये चलबिचल | NCP | Jitendra Awhad Birthday

यावेळी तहसीलदार बहिरम यांनी तक्रारदाराकडे १५ लाख रुपये लाचेची मागणी केली. ही लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी सायंकाळी सापळा रचून बहिरम यांनी १५ लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना अटक केली.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहिरम यांच्या फ्लॅटमध्ये पथकाकडून झडती करण्यात आली. पोलिस निरीक्षक संदीप घुगे, निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी ही कारवाई केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com